आजच्या धकाधकिच्या जिवनात नवनविन व्यवसाय, उद्योग सुरु होतांना दिसतात. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जिवनातच आपल्याला कुठल्या क्षेत्रात करिअर करायचे त्याचा निर्णय घ्यायला पाहीजे. सदस्थितीत विद्यार्थ्यांनी बँकिग, फायनान्स व इन्शुरन्स क्षेत्रात रोजगारासाठी संधी उपलब्ध असून त्याकडे लक्ष केंद्रीत करायला हवे, असे आवाहन प्राचार्या डॉ. प्रतिमा वाघ यांनी केले.
देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात बजाज फीनसर्व कंपनीतर्फे बँकिंग, फायनान्स व इन्शुरन्स या विषयावर उदबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर बजाज फीनसर्व कंपनीचे विकास करंजीकर, अश्विन निगुडकर, निकीता इसरानी, वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. विजय गायकवाड आदी होते. यावेळी कंपनीच्या पदाधिका-यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगीतले की, बँकिग क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनसंपर्क, आत्मविश्वास, व्यक्तिमत्व विकास या मुददयावर भर द्यावा. वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांसाठी बँकिंग, फायनान्स व इन्शुरन्स व्यवसाय या विषयावर एक महीन्याचे प्रशिक्षणाची सुविधा एसव्हीकेटी महाविद्यालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रास्ताविक व सुत्रसंचलन डॉ. श्वेता श्रीमाली यांनी केले. आभार डॉ.एस.इ. कर्डक यांनी केले.