महापालिकेच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात खासगी लँबकडुन दोन ते पंधरा दिवसात अहवाल देणे बंधनकारक आहे, पन्नास दिवस उलटुनही अहवाल दिला जात नाही. कर्मचारी रुग्णांची उध्दटपणे बोलत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे आल्यावर सोमवारी ( दि.१४ ) लँबच्या कर्मचाऱ्यांना घेराव घातला. रुग्णांची उध्दटपणे बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनसे स्टाईलने धडा शिकविल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
ठाकरे रुग्णालयातील पालिकेची लँब बंद केल्याने खासगी लँबचे या ठिकाणी वर्चस्व आहे. तपासणीसाठी अधिक दर द्यावे लागत आहे. लँबचे कर्मचारी महिला, जेष्ठ रुग्ण यांच्या सोबत अरेरावीची भाषा वापरतात. त्यामुळे महिलांसह पुरुष रुग्णांमध्ये लँबविरोधात तीव्र संताप निर्माण होत आहे. पालिकेचे अधिकारी लँब व्यवस्थापनास पाठीशी घालतात. परिणामी रुग्णांची हेळसांड होते. याविरोधात सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष बंटी कोरडे, व पदाधिकारी यांनी रुग्णालयात घोषणाबाजी केली.
खासगी लँब बंद करा
पालिकेच्या लँब मध्ये सर्व तपासण्या झाल्याच पाहिजे, रुग्णांना बसण्यासाठी जागा करावी, तसेच तपासणी अहवाल हा वेळेवर मिळालाच पाहिजे अशा आदी प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या.दोन दिवसात सुधारणा झाली नाही तर, लँब कार्यालयाची खळखट्याक करण्याचा इशारा यावेळी दिला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यांच्याकडे तक्रार
विभाग अध्यक्ष प्रकाश बंटी कोरडे,मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाणे, विधानसभा निरीक्षक प्रमोद साखरे, नाशिक शहर उपाध्यक्ष रोहन देशपांडे, नितीन पंडित,दत्ता कोठुळे, विजय बोराडे,संजय हंडोरे,विनायक पगारे, नितीन धानापुणे, शशिकांत चौधरी, उमेश भोई, बाजीराव मते, गौरव निमसे, आदित्य कुलकर्णी, विल्सन साळवि, मयूर कुकडे, गोरखनाथ शिंदे, अभिषेक सोनार, अमर जमधडे, अर्जुन गुरव वैभव शिंदे, विजय सूर्यवंशी, कृष्णा पुरकर, महिला आघाडी भानुमती अहिरे मीरा आवारे, अस्मिता काजळे रोहित शिंदे आदी.