नाशिकरोड : उमेश देशमुख
येथील दसक पंचक जेलरोड शिवजयंती उत्सव २०२६ च्या व्यासपीठाचे भूमिपूजन मंगळवारी ( दि. ३ ) सकाळी श्रीफळ वाढवत झाले. जेष्ठ नेते दत्ता गायकवाड आणि निवृत्ती अरिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यासपीठाचे पूजन झाले. मागील वर्षाप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रेमी जनतेला यंदा कार्यक्रमांची मेजवानी राहील अशी माहिती आयोजकांनी दिली.
जेलरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या व्यासपीठाचे पूजन झाले. यावेळी बोलतांना दत्ता गायकवाड यांनी दरवर्षी नाशिक रोड आणि जेल रोड परिसरात मोठ्या जल्लोषात शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. त्याप्रमाणे यावर्षी देखील शांततेत आणि उत्सवामध्ये शिवजयंती उत्सव पार पडेल. अशी अपेक्षा व्यक्त केली. यंदाच्या शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कैलास आढाव यांनी मनोगत व्यक्त केले. यावर्षी शिवजयंती उत्सवांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जपा, जगा आणि आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवावा अशी संकल्पना ठेवण्यात आल्याचे कैलास आढाव यांनी सांगितले.
दरम्यान दिनांक ९ ते १५ फेब्रुवारी दरम्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज इंदूर स्टेडियम मध्ये भव्य शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्मिळ छायाचित्र आणि पुस्तके ठेवली जाणार आहे. त्याचप्रमाणे येथील अमृत उद्यान येथे एक काठी लेकीच्या बळकटीसाठी या मर्दानी खेळाचे प्रशिक्षण दिनांक ९ ते १५ फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी चार ते सहा वेळेत आयोजित केले आहे यामध्ये अडीचशे महिलांचा सहभाग असणार आहे. तसेच दिनांक १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रम पार पडणार आहे.

व्यासपीठ भूमिपूजन प्रसंगी कार्याध्यक्ष कृष्णा बोराडे, उपाध्यक्ष ॲड. निलेश सानप, उपाध्यक्ष ॲड. संदीप कारवाल, सरचिटणीस संतोष वाजे,चिटणीस योगेश कपिले, खजिनदार चंद्रकांत चव्हाणके, प्रसिद्धी प्रमुख सागर कोठ्मे,अवधूत टिळे, अनुज बोराडे आदी उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुनील बोराडे, सागर भोजने, शिवा ताकाटे, रोशन आढाव, धनंजय लोखंडे, कुलदीप आढाव, नगरसेवक मंगलाताई आढाव, नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेवक शैलेश ढगे, सूर्यकांत लवटे,माजी नगरसेवक दिनकर आढाव, दिनकर दत्तोपंत आढाव,बांधकाम व्यावसायिक हेमंत गायकवाड, नगरसेवक आर.डी.धोंगडे, नगरसेवक रंजनाताई बोराडे, नगरसेवक सुनिता भोजने, दीपला कपिले आदींची उपस्थितीत होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोहन निसाळ,मयूर आढाव,शिवम आढाव, मयूर घोरपडे आदी प्रयत्नशील होते.



