31.1 C
Nashik
Saturday, October 24, 2026
spot_img

ऋतुजा आहिरे ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कारने सन्मानित 

70 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख 

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती करणाऱ्या सोशल इन्फ्लुएंसर तथा सामाजिक कवयित्री ऋतुजा दिनकर आहिरे यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन यांच्या वतीने ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्याबरोबर त्यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या देवळाली कॅम्प व पिंपळगाव महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कामकाज केले आहे. पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.

सामाजिक प्रश्न, महिला सक्षमीकरण, शिक्षण, युवा पिढी, संविधानिक मूल्ये आणि समाज जागृतीपर विषयांवर आपल्या लेखनातून व सोशल मीडिया माध्यमातून त्या सातत्याने जनजागृती करीत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची आणि प्रभावी लेखणीची दखल घेत आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनकडून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या सन्मानाबद्दल बोलताना ऋतुजा दिनकर आहिरे यांनी सांगितले की, “माझ्या सामाजिक कार्याची आणि लेखणीची दखल घेऊन मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. हा सन्मान माझ्या पुढील सामाजिक कार्याची जबाबदारी आणखी वाढवणारा आहे.”या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles