19.2 C
Nashik
Tuesday, February 10, 2026
spot_img

लिनेस क्लब नाशिकरोड अध्यक्षपदी वैशाली राठोड यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात

144 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

येथील ऑल इंडिया लिनेस क्लब नाशिकरोडच्या अध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा राजराजेश्वरी मंगल कार्यालयाचे संचालक राज राठोड यांच्या पत्नी वैशाली राठोड यांची अध्यक्षपदी निवड झाली. रविवारी ( दि. ८ ) पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. राठोड यांचे निवडीमुळे जरूर परिसरातील महिला वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे.

मुख्य अतिथी म्हणून बहु प्रांत अध्यक्ष तथा पदग्रहण अधिकारी अंजली विसपुते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. त्यांच्या हस्ते राठोड यांना शपथ दिली. शायनिंग स्टार हे स्वयंप्रकाशित तारे असतात. असे उदाहरण देऊन अध्यक्ष वैशाली राठोड सूर्याप्रमाणे तेजस्वी आल्याचे कौतुक प्रमुख अतिथी विसपुते यांनी केले.

यावेळी गेस्ट ऑफ ऑनर पी. डी पी. ॲड श्यामला दीक्षित, आय.पी.डी.हेमा गिरीधानी, पी.पी.संगीता गायकवाड यांची उपस्थिती होती. दरम्यान सेक्रेटरी भरती सुळे, ट्रेजरर शालिनी भारसखार,माधुरी मणियार यांची देखील नियुक्ती झाली. दरम्यान नवनिर्वाचित अध्यक्ष वैशाली राठोड यांचे स्वागत सुमधुर संगीत आणि नृत्य सादर करून केले. नृत्यामध्ये कीरण भोपुलकर, पल्लवी वाघ, मनिषा पवार यांनी सहभाग घेतला.

याप्रसंगी बीनिशा निरगुडे, प्रतिभा कुंभकर्ण, मेघा पिंपळे, अंजली कुलकर्णी, स्मिता सप्रे, अंजली जोशी, भाग्यश्री हिरे, वनिता पोहोणीकर, नीता नगरकर, विजया राऊत, चंद्रकला साबळे, सुरेखा निमसे मेघा वाळुंज, ज्योती कुटे आदी लीनेस क्लब मेंबर यांची उपस्थिती होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles