20.3 C
Nashik
Wednesday, February 4, 2026
spot_img

इगतपुरीच्या पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात वृक्षारोपण ; हरित सेना उपक्रमांतर्गत कार्यक्रम

184 Post Views

 

नाशिक : उमेश देशमुख

येथील मराठा विद्या प्रसारक संचलित पुंजा बाबा गोवर्धने महाविद्यालयात भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी ( दि.२६ ) वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. हरित सेना उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र समाजाचे इगतपुरी तालुका संचालक ॲड संदीप गुळवे होते.

सामाजिक वनीकरण विभाग इगतपुरी आणि कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण रकिबे आणि सामाजिक वनीकरणविभागाचे वनपाल आर.के.अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.अ‍ॅड. संदीप गुळवे यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता समाजातील प्रत्येक घटकाने हिरिरीने सहभाग घेणे काळाची गरज असल्याचे सांगितले.

प्राचार्य डॉ. किरण रकिबे यांनी “प्रजासत्ताक दिनी वृक्षारोपण करणे हे महत्त्वपूर्ण योगदान देण्यासारखे असून पृथ्वीचे अस्तित्व टिकवण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाचा हा उपक्रम अभिनंदनच प्राप्त असल्याचे म्हटले.वनपाल आर.के. अहिरे म्हणाले की, हरित सेनेच्या माध्यमातून राबविलेला हा उपक्रम महाविद्यालयाच्या नैसर्गिक सौंदर्यात नक्कीच भर घालणार आहे.

यावेळी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने वृक्षारोपणात भाग घेतला. याप्रसंगी म्हणून संपतराव मुसळे, शरद हांडे, गिरीश मेधने, उत्तम गोवर्धने, प्रा.संजय फाकटकर,प्रा.नवनाथ बोंबले उपस्थित होते.उपक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश दिवटे व चंद्रकांत खातळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles