देवळाली कॅम्प, प्रतिनिधी भारत देश शुरवीरांची भूमी आहे. भारतावर अनेक आक्रमणे झाली. भारतीय सैन्याने शत्रूंना परतावून लावले. प्रसंगी रक्त सांडले. त्यांच्या बलिदानाची आठवण आपण ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपसभापती डी.बी. मोगल यांनी केले.
देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमालबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात गुरुवारी ( दि.२५ ) भारत सरकारच्या प्रसारण आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने भारत की आजादी का अमृत महोत्सव व कारगिल विजय दिन या कार्यक्रमाचे उदघाटन मविप्र संस्थेचे उपसभापती डी.बी. यांनी मोगल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपसभापती डी. बी. मोगल बोलत होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .एस .काळे सेवक संचालक डॉ.संजय शिंदे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड, भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे नाशिक ब्युरोचे संचालक एस.बी.मलखेडकर, वंदना थिगळे आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एस. एस. काळे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जातो. १२ मार्च २०२१ रोजी स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण झाले. कारगिल विजय दिवस २६ जुलै रोजी साजरा केला जातो, भारताने १९९९ मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला. यानिमित्ताने आझादी का अमृत महोत्सवादरम्यान एस. व्ही. के. टी. कॉलेजमध्ये सांस्कृतिक,साहित्यिक कार्यक्रम व प्रदर्शनाचे आयोजन केले करण्यात आले आहे. प्रास्ताविक सेवक संचालक डॉ. एस. के. शिंदे यांनी केले.सूत्रसंचालन व आभार उपप्राचार्य डी. टी. जाधव यांनी मानले.
शुक्रवारी विविध कार्यक्रम : चौकट कारगिल विजय दिनानिमित्त देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजूकाया महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दिनांक 26 जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपन्न होणार आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी देशभक्तीची जाणीव दृढ व्हावी, या उद्देशाने कारगिल विजय दिवस ही संकल्पना समोर ठेवून चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि देशभक्तीपर गीत स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे केंद्रीय संचार ब्युरो नाशिक येथील प्रमुख अधिकारी तसेच कर्नल प्रमोद नैनन मविप्र संस्थेचे सरचिटणीस ऍड. नितीनजी ठाकरे, संचालक रमेश आबा पिंगळे तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित राहणार आहे.