इगतपुरी : विक्रम पासलकर तालुक्यात गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाने आपले सातत्य ठेवल्यामुळे धरणांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असून आज दुपारी भावली धरण तुडुंब भरून त्यातील अतिरिक्त पाणी दारणा च्या पाणलोट क्षेत्रात विसावत आहे.गेल्या दोन दिवसांत जवळपास अडीचशे मिमी पाऊस पडला आहे.त्यामुळे दारणा, भाम, वाकी खापरी, कडवा, मुकणे आदी धरणांच्या साठ्यात समाधानकारक पाण्याची आवक होत आहे.
तालुक्यातील ब्रिटिशकालीन दारणा धरणामध्ये काल पर्यंत 66टक्के पाण्याची उपलब्धता होती.रात्रभर आणि आज दिवसभर पावसाने जोरदार फटकेबाजी केल्यामुळे दारणा जवळपास 75 टककयाच्या पुढे सरकले आहे. या पार्श्वभूमीवर ख़बरदारिचा उपाय म्हणून आज दुपारी एक 1800 क्यूसेक ने विसर्ग सुरु केला होता.धरणात पाण्याची विक्रमी होणारी आवक लक्षात घेवून पाटबंधारे विभागाने पाच वाजता हाच विसर्ग 2498 क्यूसेक केला आहे.
दरम्यान पानलोट क्षेत्रातील घोटी,इगतपुरी परिसरात पावसाने उसंत घेतलेली नाही म्हणून सायंकाळी 7 वाजता हाच विसर्ग 3 हजार कुयसेक करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ठ केले आहे. भाताच्या आवण्या जोरात सुरु आहेत. भात पिकाला पोषक पाउस बरसत असून तालुक्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहु लागले आहेत. त्यामुळे येथील निसर्ग सौंदर्याची भुरळ हौशी पर्यटकां ना पडू लागली असून सर्वच ठिकाणी ते गर्दी करू लागले आहेत. पोलिसांची त्यांच्यावर करडी नजर असून हुल्लड़ बाजी करणा-यांना त्यांच्याच भाषेत चोप दिला जात आहे.दारणा नदीला मोठा पुर येण्याची शक्यता ग्रहीत धरुन लाभ क्षेत्रातील साकुर, शेणित तसेच नाशिक तालुक्यातील वंजारवाड़ी, लहवित,संसरी, देवळाली कॅम्प, नानेगाव,शेवगे दारणा,चेहेड़ी आदी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला नागरिकांनी नदिकाठी जाऊ नये आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.