इगतपुरी तालुक्यात पावसाचा हाहाकार ! ; सर्वत्र जलमय पुरस्थिती; अस्वली स्टेशन- मुंढेगाव-घोटी चा संपर्क तुटला,दारणा, मुकणे, भावली,भाम,वाकी धरणांतून मोठा विसर्ग
गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेल्या कधी हलक्या तर कधी मध्यम स्वरूपाच्या पावसाने अलीकडच्या पंधरा दिवसांपासून रौद्र रूप धारण केले असून संपूर्ण तालुक्यात जलमय स्थिती बघायला मिळत आहे. दोन दिवसांपासून पावसाचा जोर खुप वाढल्याने दारणा,भाम तसेच उंडओहोळ नदी दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे सर्वच धरणातून हजारों क्यूसेक पाण्याचा मोठा विसर्ग सुरु करण्यात आलाआहे. भगुर,वंजारवाड़ी,शेवगेदारणा,संसरी,नाणेगाव गाव नदी काठ च्या गावाना प्रशासनाने सतर्क तेचा इशारा दिला आहे.
रविवार ( दि. ६ ) सकाळी सहा वाजे पर्यंत गत चोवीस तासांत 110 मिमी तर सायंकाळी सहा पर्यंत बारा तासांत जवळपास विक्रमी150 मिमी पाऊस पडला आहे. आज सायंकाळ पर्यंत एकूण 1 हजार700 मिमी पाऊस पडला आहे. यंदा सरासरीच्या दीड पट अधिक पाऊस पड़त असल्याने शेती पिकांची मोठी हानी झाली आहे. तालुक्यातील सर्वच धरणे, पाझर तलाव भरले असून मोठा विसर्ग सुरु आहे. भाताच्या लागवडी पावसामुळे संत गतीने सुरु असून काही शेतकऱ्यांच्या भाताच्या रोपांची पुरती वाट लागली असल्याने त्यांना पुन्हा चिखलावर मोडवलेले बियाने टाकावे लागत आहे.शेतामध्ये पुर पाणी येत असल्याने बांध फुटून शेत खच्चराचे नुकसान होत आहे. इगतपुरी तालुक्यात सर्वत्र जलमय स्थिती झाल्याने शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष हरीष चव्हाण यांनी केली आहे.
अस्वली स्टेशन-घोटी संपर्क तुटला
दरम्यान घोटी-मुंढेगाव-अस्वली स्टेशन-भगुर राज्य मार्गावरिल अस्वली स्टेशन येथील पुलावर पाणी आल्याने हा राज्य मार्ग बंद झाला आहे. या ठिकाणी गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेल्या पुलाचे काम बंद पडल्याने येथील स्थानिक विद्यार्थी,दुग्ध व्यावसायिक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे खुप हाल होत आहे.
भाम,भावली,वाकी ओव्हरफ्लो
तालुक्यातील भावली आणि काळूस्ते येथील पंतप्रधान सिंचन योजनेतून बाँधलेले भाम धरण नुकतेच पूर्ण क्षमतेने भरले आहे .सायंकाळी सहा वाजता वाकी धरण देखील शंभर टक्के भरले. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांत जुलैच्या पहिल्या आठवड्यातच तालुक्याची तीन धरणे पहिल्यांदा भरली.
दारणा 70 टक्के,कड़वा 65 टक्के,मुकणे 75 टक्के अशी आकडेवारी असल्याने ही धरणे देखील भरण्याच्या मार्गावर आहेत.