रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी आणि पांडुरंगाच्या महिमा वर्णन करणाऱ्यां विविध अभंगाचा निनाद, टाळांचा खणखणाट, पखवाज आणि विणाची साथ संगत याचा मेळ साधून माणिकखांब येथील प्रति पंढरपुर समजल्या जाण्याऱ्या श्री विठ्ठल रुक्खमिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.
अनेक अडचणी मुळे प्रत्यक्षात पंढरपुर ला जाऊ न शकणाऱ्या भाविकासाठी हे मंदिर प्रति पंढरपुर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर दारणा नदी तिरावर असून जणू काही चंद्रभागेच्या तिरावर मंदिर असल्याची प्रचिती सर्वांना येत असते. माणिकखांब येथील पार्थ कोचिंग क्लास च्या विदयार्थ्यानी संपूर्ण गावातून पायी चालत येत पायी दिंडी सोहळा काढून गोल रिंगण करून आनंद घेतला. इगतपूरी त्र्यंककेश्वरचे लोकप्रिय आमदार हिरामण दादा खोसकर यांनी पहाटे मंदिरात येवून महा अभिषेक पुजा व महा आरती केली. चव्हाण परिवाराच्या वतिने आमदार साहेबांना श्री विठ्ठल रूक्खमिणी मुर्ती भेट देऊन त्याचां सत्कार करण्यात आला. इगतपूरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात इडा पिडा जाओ बळी चे राज्य येवो बळी राजा ला चांगले दिवस येवू दे अशी प्रार्थना आमदार हिरामण खोसकर यांनी पुजेच्या वेळी केली . यावेळी गावासह पंच क्रोशितील भाविकांनी सुद्धा दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी दर्शना साठी इगतपूरी तालुक्यातील वाळविहिर शिंदेवाडी भूमिपूत्र विधान परिषद चे आमदार जगन्नाथ शिंदे यानी सदिच्छा भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले. घोटी पोलिस स्टेशन पि. आय. विजय शिंदे साहेब, इगतपूरी पोलिस स्टेशन पि.आय. एस. व्ही. अहिरराव मॅडम मा. जि. प. सदस्य गोरख बोडके, ॲड. एन. पी. चव्हाण, ॲड. जि. पी. चव्हाण, सहा. आयुक्त महेशजी देवरे साहेब, कमलाकर नाठे, मदन कडू, डॉ. महेंद्र शिरसाठ, डॉ. धनजंय चव्हाण, तुकाराम वारघडे, किरण मुसळे, मा. सरपंच हरिष चव्हाण, मा. उपसरपंच विनोद चव्हाण, हभप बन्सी बुवा चव्हाण , हभप लक्ष्मण बुवा चव्हाण , दिपक चव्हाण , विजय चव्हाण शिवाजी येलमामे, चंद्रशेखर येलमामे आदी ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्तीत होते.