19.1 C
Nashik
Wednesday, February 4, 2026
spot_img

के. एन. केला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बिश्वास यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार

176 Post Views

नाशिक रोड, प्रतिनिधी

येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित के. एन. केला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चैताली बिश्वास यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ झाला. संस्थेचे सचिव विजय चोरडिया यांनी बिश्वास यांच्या शाळेतील प्रगतीतील योगदानाचा उल्लेख केला. शाळेची प्रगती ही मुख्याध्यापिका यांच्या कठोर परिश्रमातून झाल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्याध्यापक रघुनाथ गायकवाड, उपमुख्याध्यापिका रेखा मोझे, पर्यवेक्षक लता लाड, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मंगला एखंडे, अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उर्मिला भालके, ब्ल्यू बेल शाळेचे मुख्याध्यापक आनंद परदेशी, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. चैताली बिश्वास यांनी आपल्या सेवाकाळात शाळेच्या प्रगतीसाठी समर्पितपणे कार्य केले. शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील यशामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. कठोर शिस्त आणि विद्यार्थ्यांवरील प्रेम यामुळे त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मन जिंकल्याचे मान्यवरांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. चैताली बिश्वास यांनी सहकारी, विद्यार्थी, पालकांचे आभार मानले. सलोनी रॉय यांनी सूत्रसंचालन केले. 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles