दिंडोरी : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने दिंडोरी तालुक्यातील मौजे पाडे येथे कृषिदिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या सहभागात कृषी दिंडी काढण्यात आली. परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
राज्यात दि. १ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त शाळा, विद्यार्थी, व कृषीकन्या यांनी एकत्र येत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.दरम्यान विद्यार्थ्यांनी गावातून कृषी दिंडी काढत शेतकऱ्यांचे योगदान, सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि पर्यावरण रक्षण याबद्दल घोषवाक्ये देत जनजागृती केली. हातात फलक,आणि शालेय बँडसह विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
मौजे पाडे येथील शाळेच्या मुख्याध्यापिका लीला भामरे, तसेच इतर शिक्षक,शिक्षिका जया साबळे, विजया चव्हाण, हिरा भोये, संगीता पवार, शुभांगी, साबळे मोहिनी भगत व बापू पाटोळे तसेच कृषीकन्या ( कार्यमोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय चाचडगाव) किर्ती साळवे, सानिका सांगळे, अल्फिन सय्यद, ऋतुजा शिंदे, साक्षी डोलनर, देवश्री पवार, यांनी सहभाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच नरेंद पेलमहाले, व आदी ग्रामस्थ उपस्थित होते