बेरोजगारांचा कल सरकारी नोकरीकडे अधिक असतो.त्यात वावगे काहीच नाही.पण आजकाल सरकारी नोकरी मिळणे अतिशय कठीण झाले आहे. त्याऐवजी बेरोजगारी व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करायला हवे. विशेषतः ग्रामीण भागात व्यवसायाला पसंती देऊन परिसराच्या विकासाला हातभार लावायला हवा.असे आवाहन खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले.
नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बॅंकेची रविवारी ( दि.२२ ) ३० वी शाखा साकुर फाटा येथे सुरू झाली. उदघाटन महामंडलेश्वर सविदानंद सरस्वती आणि खासदार राजाभाऊ वाजे, बॅंकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, लालाचंद जैन, बॅंकेचे उपाध्यक्ष डॉ. प्रशांत भुतडा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी खासदार राजाभाऊ वाजे बोलत होते.
व्यासपीठावर जनसंपर्क संचालक अरुण जाधव, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती आरिंगळे, संचालक मनोहर कोरडे, वसंत आरिंगळे, सुनिल आडके, गणेश खर्जुल, नितीन खोले, श्रीराम गायकवाड, सुनिल चोपडा, योगेश नागरे, विलास पेखळे, सुधाकर जाधव, प्रकाश घुगे, कमल आढाव, रंजना बोराडे, सुदाम गायकवाड, कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागेरे, मंगेश फडोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम, उप महाव्यवस्थापक संजय हिंगे, मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण गवळी, शाखा व्यवस्थापक अमोल हांडोरे यांची उपस्थिती होती.
सविदानंद सरस्वती म्हणाले की, व्यापारी बॅंकेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांनी सभासद व ग्राहकांना अधिक चांगली सेवा द्यावी. सेवेमध्ये मोठी ताकद असते. व्यापारी बॅंक आदर्श व नावलौकिक मिळवून आहे. निवृत्ती अरिंगळे यांनी प्रास्ताविक केले. मनोहर कोरडे यांनी सूत्रसंचालन केले. सुनिल चोपडा यांनी आभार मानले.
याप्रसंगी उत्तमराव सहाणे, बाळासाहेब कुकडे, अतुल धोंगडे, प्रशांत कापसे, ज्ञानेश्वर पागेरे, विष्णु सहाणे, देविदास शिंदे, राजाभाऊ धोंगडे, निवृत्ती जाधव, एकनाथ घोटेकर, सुनिल जाधव, बाळासाहेब खाताळे, प्रकाश भगत,नामदेव वाघचौरे, नामदेव राजभोज, भगवान वाघचौरे, बाळू गायकवाड, नाना टोचे, रामदास बांडे, कचरु कडभाने, पंढरीनाथ झनकर, हेमंत झनकर, संजय आरोटे, शाम हांडोरे, संजय वाघचौरे, सुरेश वाघचौरे, आदी उपस्थित होते.