364 Post Views
देवळाली कॅम्प, प्रतिनिधी
भारतीय सैन्यात नोकरी करणे म्हणजे पैसे कमविण्याची नोकरी नाही. जीवन जगण्यासाठी जेथे अन्न, पाणीही मिळत नाही, मृत्यु सतत समोर उभा दिसतो. तरीही आमचे जवान राष्ट्र बांधिलकीची भावना समोर ठेवून कर्तव्य बजावत असतात. असे प्रतिपादन माजी कर्नल नैनन प्रमोद यांनी केले.
देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात शुक्रवारी [दि.२६] भारत सरकारच्या माहिती प्रसारण आणि सांस्कृतिक मंत्रालय क्षेत्रीय कार्यालय नाशिक व मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजादी का अमृत महोत्सव व कारगिल विजय दिनानिमित्ताने दोन दिवसीय कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी माजी कर्नल नैनन प्रमोद बोलत होते.
जत्रा हॉटेल परिसरात स्वप्नातील घरांसाठी एकमेव विश्वासपात्र समृद्धी बिल्डकॉम

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मविप्रचे संचालक रमेश पिंगळे म्हणाले की, भाग्यवान लोकांनाच देशाचे संरक्षण करण्याची संधी मिळते, समाजात मान मिळतो, त्यामुळे तरुणांनी देशसेवेसाठी सैन्यात भरती व्हावे, असे आवाहन केले. कारगिल युध्दात प्रत्यक्ष सहभाग घेतलेले माजी सैनिक हवालदार प्रकाश डेरिंगे यांनी जीव विसरुन संघर्ष केल्याशिवाय युध्दात यश मिळत नाही, याची प्रचिती मी कारगिल युध्दात घेतली आहे. माझ्या समोर सहका-याचे बलीदान अन त्यामुळे निर्माण झालेला तणाव अनुभवला. प्राचार्य डॉ. एस.एस. काळे स्वागतपर भाषणात म्हणाले की, भारतीय लष्कारातील सैन्याचे चित्तथरारक अनुभव कारगिल दिनानिमित्ताने ऎकायला मिळत असतात. देशसेवा करण्यासाठी आजची तरुण पिढी पुढे येत असल्याचे चित्र दिसून येत असल्या बददल समाधान व्यक्त केले. व्यासपीठावर मविप्रचे संचालक रमेश पिंगळे, सेवक संचालक डॉ. एस. के. शिंदे, भारत सरकारच्या माहिती प्रसारण आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या क्षेत्रीय अधिकारी एस.बी. मलखेडकर, प्राचार्य डॉ.एस.एस. काळे वंदना थिगळे, जेष्ठ विधीतज्ज्ञ तथा देणगीदार अॅड. एन.जी. गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड, कटक मंडळाचे माजी उपाध्यक्ष बाबुराव मोजाड, अॅड. अशोक आडके, अॅड. बाळासाहेब रहाडे, माणिकराव गोडसे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष खंडेराव मेढे, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष वैभव पाळदे, माजी विद्यार्थी संघाचे खजिनदार गजीराम मुठाळ, प्रा. सुनिता आडके, प्रशांत गोवर्धने रवि संगमनेरे आदी उपस्थित होते.

दरम्यान कारगिल दिनानिमित्ताने परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. तसेच देशभक्तीपर गित गायन, रांगोळी, चित्रकला, प्रश्नमंजूषा आदी विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. प्रास्ताविक एस.बी. मलखेडकर यांनी केले. जेष्ठ विधीतज्ज्ञ तथा देणगीदार अॅड. एन.जी. गायकवाड यांच्याकडून विजेत्यांना आर्थिक मदत करण्यात आली. पाहुण्यांचा परिचय सेवक संचालक डॉ.एस. के. शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन उपप्राचार्य दिलीप जाधव यांनी केले. आभार डॉ. स्वाती सिंग यांनी मानले.