नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या गिरणारे येथील शाखेचे उद्घाटन करतांना मला विशेष आनंद होत आहे, कारण माझे आजोबा या बॅंकेच्या संस्थापक संचालकांपैकी एक होते. पारदर्शकता व सचोटीच्या बळावर या बँकेने एनपीए ४४ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणल्याने जनतेचा सहकारावर विश्वास दृढ करण्यासाठी मदत झाली आहे. संचालक मंडळाला याचे श्रेय जाते. बॅंकेच्या गिरणारे शाखेत ठेवी ठेऊन, कर्ज घेऊन वेळेत फेडून, सहकार्य करावे, असे आवाहन खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले.
बँकेची २८ वी शाखा गिरणारे येथे सुरू झाली. शाखेचे उदघाटन केल्यानंतर खासदार वाजे बोलत होते. आमदार सरोज आहिरे, जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी, माजी आमदार योगेश घोलप, त्र्यंबकराव गायकवाड, लालाशेठ जैन, विष्णुपंत म्हैसधुणे, दिलीप थेटे, निवृत्ती घुले, विलास शिंदे, बाळासाहेब हांडोरे, पुंडलिक थेटे, राजाराम धनवटे, मुरलीधर पाटील, बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, उपाध्यक्ष मनोहर कोरडे, बँकेच्या व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हॉटेल जत्रा परिसरात स्वप्नांच्या घरासाठी विश्वासपात्र ठिकाण “समृद्धी बिल्डकॉम”
बँकेचे व्यवहार व उत्तम व्यवस्थापन यामध्ये नाशिक रोड देवळाली बॅँक ही पावणे दोनशे सहकारी बँकांत दहाव्या क्रमांकावर आहे, असे स्पष्ट करून फयाज मुलाणी म्हणाले की, संचालकांच्या मदतीला कार्यक्षम व नम्र कर्मचारी वर्ग आहे. २०१४ पासून केंद्र व राज्य सरकारने शेतक-यांच्या विकासासाठी पाऊले उचलली आहेत. सहकार बळकटी करणासाठी केंद्रात स्वतंत्र सहकार खाते निर्माण करण्यात आले आहे. केंद्र व राज्यस्तरावर सहकार विकासाचा प्रयत्न सुरू आहे. ५२ सोसायट्यांची सबलीकरण करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. कांदा खरेदी करण्यासाठी विविध कार्यकारी सोसायट्यांना परवाने दिले जातील. गोदामे उभारण्यासाठी सहकार्य केले जात आहे.शेतकरी संख्या जास्त असलेल्या गिरणारेत मोठी बाजारपेठही आहे. बँकेने शाखा सुरू करून शेतक-यांच्या अडचणी दूर केल्या आहेत. राष्ट्रीयकृत बँकांतून शेतक-यांना कर्ज प्राप्त होण्यात समस्या येतात. शेतक-यांसाठी पाच लाख कर्ज देण्याची मर्यादा नाशिक रोड बॅंकेने वाढवून २५ लाख करावी, अशी मागणी आमदार सरोज आहिरे, योगेश घोलप यांनी केली.
दत्ता गायकवाड म्हणाले की, बँकेने ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्रप्रणाली उपयोगात आणली आहे. जिल्ह्यातील सहकारी बँकांतील ४३ बँकांमध्ये नाशिक रोड बॅंक अग्रस्थानी आहे. बॅंकेच्या ठेवी ६२० कोटींवर आहेत. सहकाराच्या माध्यमातून १९६१ साली स्थापन झालेल्या या बँकेने उत्तम विकास साधला आहे. व्यापा-यांनी स्थापन केलेल्या या बँकेने तरूण व्यवसायिकांना उभे केले. त्यातून नामवंत उद्योजक तयार झाले आहेत.
निवृत्ती अरिंगळे म्हणाले की, दिंडोरी, पिंपळगाव, सिन्नर, घोटी अशा ग्रामीण भागात बॅंकेने शाखा सुरू केल्या आहेत. १९६१ साली एक लाख ६० हजारांच्या भाग भांडवलावर सुरू झालेली ही बँक आज एक हजार कोटींच्यावर व्यवसाय करत आहे. सामाजिक उपक्रमांमध्येही बॅंक आघाडीवर आहे. ग्राहक, खातेदारांसाठी बॅंकेच्या विविध योजना आहेत.
संचालक श्रीराम गायकवाड, अरूण जाधव, डॉ. प्रशांत भुतडा, अशोक चोरडिया, रमेश धोंगडे, जगन्नाथ आगळे, सुधाकर जाधव,नितीन खोले, रामदास सदाफुले, सुनिल आडके, जगन्नाथ आगळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. शाखेचे वास्तुविशारद अमित देवकर व जागा मालक आबासाहेब कदम यांचा राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते सत्कार झाला. संचालक गणेशखर्जुल, योगेश नागरे, वसंत अरिंगळे, कमल आढाव, ॲड. सुदाम गायकवाड, राहुल हगवणे, पद्मा थोरात, विलास पेखळे, रंजना बोराडे, कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागेरे, मंगेश फडोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम आदींनी संयोजन केले. दिनकर आढाव, विलास घाडगे, रमेश जाचक, प्रा. जयंतकुमार आहेर, नितीन गायकर, सुरेश पिंगळे, संतोष साळवे, कचरू तांबेरे, विष्णू थेटे आदींसह व्यापारी, शेतकरी, नागरीक उपस्थित होते.