राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी शुक्रवारी नाशिक पूर्व मतदार संघाचे आमदार ॲड राहुल ढिकले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर पदाधिकारी आणि इंजिनिअर शेखर ढिकले यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. नाशिक दौऱ्यावर असताना वेळ काढून ना. पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसते आहे.
नामदार चंद्रकांत पाटील शुक्रवारी ( दि.९ ) नाशिक दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या शिवनई येथील उपकेंद्राच्या इमारतीच्या पायाभूत सुविधांची पाहणी केली. समवेत आमदार देवयानी फरांदे, विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, प्राचार्य डॉ. सुभाष निकम, व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य आदी होते.
दरम्यान ना. पाटील यांनी आमदार ॲड ढिकले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन ढिकले कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आमदार अॅड ढिकले यांच्या सोबत संवाद साधताना शैक्षणिक उपक्रम, विकास प्रकल्प आदी बाबींवर चर्चा केली. यावेळी मंत्री ना. चंद्रकात दादा पाटील यांनी महायुतीचे सरकार महाराष्ट्रात शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी सक्रिय असल्याचे म्हटले.
जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रश्नावर चर्चा : आमदार ॲड ढिकले
नाशिक शहर व जिल्ह्यात असलेल्या टेक्निकल इन्स्टिट्यूट तसेच सिनिअर कॉलेजच्या विविध समस्या तसेच प्रश्नांच्या विषयी मंत्री महोदय नामदार पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी संवादा दरम्यान आश्वासन देत तब्येतीची विचारपूस केली.