22.6 C
Nashik
Monday, March 23, 2026
spot_img

देवळालीत उमेदवार शोधण्यासाठी शरद पवार यांची युवा ब्रिगेड सक्रिय ; आयाराम – गयाराम यांना उमेदवारी नको

993 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख
देवळाली विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहील, असा दावा केला जातो आहे. शरद पवार गटाचे युवा पदाधिकारी प्रबळ उमेदवार शोधण्यासाठी सक्रिय झाले आहे. निवडणूक तोंडावर उमेदवारी मिळविण्यासाठी ऐनवेळी पक्षात प्रवेश करणाऱ्याना उमेदवारी देऊ नये, त्यापेक्षा नव्या दमाचा कोरी पाटी असलेला उमेदवार शोधण्यावर आमचा भर आहे. कोणत्याही परिस्थितीत उमेदवार निवडुन आणू, असा निर्धार पदाधिकारी व्यक्त करतांना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले. एक गट शरद पवार यांचा तर दुसरा गट अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचा आहे. त्यापैकी पडत्या काळात शरद पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे नाशिक जिल्ह्यातील युवा ब्रिगेड उभी राहिली. कोणत्याही प्रलोभनास ते बळी पडले नाहीत. उलट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्येच राहून संघर्ष करणे त्यांनी पसंत केले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी पक्ष संघटना टिकवून ठेवली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले.

   जत्रा हॉटेल परिसरात घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी               एकमवे पर्याय “समृद्धी बिल्डकॉम”

त्यातच देवळाली विधानसभेची जागा शरद पवार यांच्या गटाला मिळणार असल्याचे निश्चित मानले जाते आहे. त्यामुळे आयाराम – गयाराम यांचा ओढा शरद पवार गटाकडे वाढतो आहे. आयाराम – गयाराम यांना शह देण्यासाठी युवा ब्रिगेड सध्या जोरदार कामाला लागली असून नवीन उमेदवार शोधण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा अध्यक्ष शाम हिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, शहराध्यक्ष बाळा निगळ,विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष तुषार जाधव, प्रदेश सचिव किरण भुसारे आदीं पदाधिकारी सक्षम उमेदवारांच्या शोधासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे.
जेष्ठांचे काम होणार सोपे
युवा ब्रिगेड समक्ष, प्रबळ आणि निवडून येणारे उमेदवार शोधून त्यांची नावे जिल्ह्यातील जेष्ठ पदाधिकाऱ्यांना कळविण्यात येईल. त्यांनतर एकमताने इच्छुक उमेदवारांची नावे राज्यातील मुख्य पदाधिकाऱ्यांना पाठवली जाणार आहे.यानंतर उमेदवारी विषयी मुबंई येथे अंतिम निर्णय होईल.

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles