इगतपुरी : विक्रम पासळकर
तालुक्यातील माणिकखांब येथे मुंबई आग्रा चौपदरी द्रुतगती मार्गावर आणि दारणा नदी तिरी व प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बुधवारीआषाढी एकादशी निमित्त आयोजित विविध कार्यक्रमाची पूर्व तयारी पूर्ण झाली आहे.आषाढ़ी एकादशी निमित्त हजारो भाविकांची मांदियाळी येथे दरवर्षी असते. यंदाही असा भक्तीचा मेळा भरणार आहे. तालुक्यात तसेच परिसरातील भाविकांमध्ये हे मंदिर प्रति पंढरपूर असल्याची भावना आहे. बुधवारी दि.१७ रोजी मंदिरात विठ्ठल नामाचा गजर होणार आहे.
मुंबई – आग्रा महामार्गावर असलेल्या माणिकखांब येथे दहा वर्षापूर्वी चव्हाण पाटिल परिवारांने एकत्र येऊन दारणा नदि तिरावर श्री विठ्ठल रुक्खमिणी मंदिर उभारले. तेव्हापासून हे देवस्थान भक्तांचे श्रद्धास्थान झाले आहे. विविध धार्मिक सोहळे कार्यक्रम हे नियमित सुरू असतात. भक्तांच्या सेवेतून देवालयाचे पावित्र्य हे अबाधित ठेवले जात आहे. आषाढी एकादशी जवळ आल्याने मंदिराची साफ सफाई सुरू झालेली दिसत आहे.
“एकादशीला विविध धार्मिक कार्यक्रम”
आषाढी एकादशी निमित्त माणिकखांब येथे रस्त्यावरिल मंदिरात श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची गर्दी उसळणार आहे. भक्ताच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल च्या जयघोषाने हा परिसर भाव भक्तीने न्हाऊन निघणार आहे. एकादशीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाचला महा अभिषेक व काकड भजन आरती, तसेच दुपारी भजन दु.१२.०० वाजता महा आरती सायंकाळी ५.०० वाजता हरिपाठ ६.०० वा. आरती व रात्री ९ ते ११ भजन होईल. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.