देवळाली कॅम्प प्रतिनिधी
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजूकाया महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागामार्फत महानायक वसंतराव नाईक जयंती व एक जुलै हा कृषी दिन म्हणून महाविद्यालयात साजरा केला. यावेळी प्राचार्य डॉ. एस.एस. काळे यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.
कृषी दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नवउद्योजक प्रयोगशील सेंद्रिय शेती अशा नावीन्यपूर्ण उपक्रम आपल्या शेतामध्ये राबविणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा सन्मान पत्र देऊन सत्कार व गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एस एस काळे प्राचार्य यांनी सेंद्रिय शेती ही काळाची गरज या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे चित्रा भवर सहाय्यक प्रकल्प अधिकारी भगुर नगर परिषद व सौ सुनंदाताई निंबाळकर संचालिका यशोधिनी उपस्थित होत्या. चित्रा भवरे यांनी शासनाच्या शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांवर प्रकाश टाकला. सुनंदाताई निंबाळकर यांनी विषमुक्त शेती सेंद्रिय शेती या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. त्यांनी त्यांचे स्वतःचे सेंद्रिय शेती बद्दलचे अनुभव कथन केले. या कार्यक्रमाप्रसंगी बारा महिला शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले त्यामध्ये विद्या दुजड, पुष्पा पाळंदे, सुनंदा कासार ,अर्चना पागेरे ,सारिका पाळदे ,अलका पागेरे ,शोभा गीते ,अनिता चौधरी, अश्विनी करंजकर, सविता करंजकर ,सुनंदा निंबाळकर, सविता करंजकर ,चित्रा भवरे आदींचा समावेश होता. महाविद्यालयातील गांडूळ खत निर्मिती प्रकल्पास सर्व महिला शेतकऱ्यांनी भेट दिली व गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण जैविक खते निर्मिती दशपर्णी अर्क बुरशीनाशके जैविक कीटकनाशके या विषयावर सखोल चर्चा केली. या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मुक्ता भामरे, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्रा. लक्ष्मण देडे, सेवक संचालक व उपप्राचार्य डॉ.संजय शिंदे, अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक डॉ. स्वाती सिंग, विविध विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मनीषा आहेर, प्रास्ताविक डॉक्टर मुक्ता भामरे, आभार प्राध्यापक सतीश कावळे यांनी व्यक्त केले.