Breaking News – नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शिक्षक मतदार संघातील संघाच्या मत संघाची मतमोजणी सुरू आहे यामध्ये विद्यमान आमदार नरेंद्र दराडे यांनी अपक्ष विवेक कोल्हे यांच्या विरोधात ९६२८ मतांची आघाडी मिळवलेली आहे. पहिल्या पसंतीचे अद्याप ४८४८ मतांची मोजणी शिल्लक आहे. विजयासाठी ठरवून दिलेल्या पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण झाला नाही तर दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकाच्या मतमोजणीवर उमेदवारांचे विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.
नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक या वेळेला अतिशय अटीतटीची होत असल्याचे चित्र मतमोजणी दरम्यान दिसून येत आहे.पहिल्या पसंतीचा कोटा विजयासाठी ठरवून दिलेला आहे. मात्र अद्याप तो पूर्ण करण्यास एकाही उमेदवाराला अपेक्षित मतदान झालेले नाही. अंदाजे ३४ हजार पहिल्या पसंतीचे मते विजयासाठी आवश्यक आहे. तेवढी मते एकाही उमेदवाराला मिळाली नसल्याने आता दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसे झाले तर दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या मतांवर उमेदवारांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.
सर्वात विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार एड. संदीप गुळवे तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेली आहे. मात्र त्यांना निर्णायक मते मिळाली नाही, म्हणून आता दुसऱ्या पसंतीचे मते मोजली जाणार आहे. यावर उमेदवारांचे जय पराजयाचे गणित अवलंबून असणार आहे.