नाशिक रोड : प्रतिनिधी
येथील प्रसिद्ध नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या अल्पबचत प्रतिनिधीवर बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. यामध्ये अल्पबचत प्रतिनिधी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या जवळील एक लाख, पाच हजार रुपयाची रक्कम हल्लेखोरांनी लंपास केल्याची घटना घडली. यामुळे नाशिक रोड परिसरात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
याबाबतचे वृत्त असे की नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेत गेल्या 32 वर्षापासून जितेंद्र बबनराव लोहारकर वय 51 राहणार शिवराम अपार्टमेंट सुवर्ण हाउसिंग सोसायटी जवळ आर्टिलरी सेंटर रोड नाशिक रोड हे डेली कलेक्शनचे अल्पबचत प्रतिनिधी मधून काम करत आहे.
बुधवारी दुपारी चार वाजेनंतर नाशिक रोड परिसरातील तसेच जेल रोड व इतर भागातील व्यापाऱ्यांच्या दुकानातील कलेक्शन करून रात्री पावणे बाराच्या सुमारास जेल रोड येथून बिटको चौक मार्गे घरी जात होते कोठारी कन्या शाळेजवळ लोहारकर आले असता अचानकपणे त्यांच्यापुढे एक दुचाकी गाडी चालक समोर आला त्यानंतर आणखी एका दुचाकी गाडीवर दोघेजण आले एकूण चार जणांनी लोहारकर यांना घेरले रस्त्यावर कोणी नसल्याचा फायदा घेऊन या चौघांनी लोहारकर यांच्याशी वाद घालून शिवीगाळ सुरू केली त्यानंतर आपल्याकडे असलेल्या धारदार शास्त्राने लोहारकर यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात लोहारकर यांच्या हाताला खांद्याला व पोटावर वार करून गंभीर जखमी केले त्यानंतर या चौघाही लुटारूंनी लोहारकर यांच्या जवळील बॅग मधील कलेक्शन जमा झालेले सुमारे एक लाख पाच हजार रुपये लुटून पलायन केले.दरम्यान काही वेळानंतर लोहारकर यांनी आपल्या नातेवाईक व सहकार्यांना बोलावून मदत मागितली त्यानंतर लोहारकर यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या घटने प्रकरणे जितेंद्र लोहारकर यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात चार अज्ञात गुंडा विरुद्ध तक्रार दाखल केली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे करत आहे.