871 Post Views
नाशिकरोड : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय योग दिना’चे औचित्य साधत जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने शुक्रवारी सकाळी योग दिन साजरा केला. यावेळी योग प्रशिक्षक विजयालक्ष्मी राऊत यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले व विद्यार्थ्यांकडूनही करून घेतले.त्यांनी विद्यार्थ्यांना योग विषयक महत्वपूर्ण माहिती दिली.
जागतिक योग दिनानिमित्त शाळेत सकाळी अतिशय आनंददायी वातावरणामध्ये शिक्षकांसमवेत विद्यार्थ्यांनी योगा करत योग दिन साजरा केला. त्यावेळेस संस्थेचे विश्वस्त योगेश गाडेकर संस्थेच्या सचिव जयश्री गाडेकर शाळेच्या मुख्याध्यापिका सरला खैरनार व शिक्षक वृंदही उपस्थित होता.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी रुद्र एखंडे व विद्यार्थिनी आयुष्ना मेहरोलिया यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका शुभदा जगताप यांनी केले. योग दिनाचे महत्त्व शाळेतील विद्यार्थिनी लक्ष्मी फिरके हिने आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच दिव्या शिरसाठ या विद्यार्थिनीने आपल्या कवितेतून व्यायामाचे महत्त्व विशद केले. तर आभार प्रदर्शन जानवी बोराडे हिने केले.