नाशिकरोड : प्रतिनिधी
देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना आघाडी मिळाली. त्यामुळे येथील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनाला भिडलेला दिसतोय, त्यातच देवळालीची जागा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने ऐवजी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला सोडण्यात येणार असल्याचे बोलले जाते आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार ज्यांच्या नावाने उमेदवारीचा टिळा लावतील, तोच देवळाली विधानसभा मतदारसंघाचा आमदार होईल, या असा वाक्यप्रचार चर्चेत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नव्हे तर शरद पवार यांची गॅरंटी चालते, असा उपरोधक टोला देखील लगावला जातो आहे.
इतर महत्वाच्या बातम्या आणी वेबसाईटवर पोहचण्यासाठी http://nashikbatmidarnews.com वर क्लिक करा
देवळाली विधानसभा मतदारसंघ एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. सलग तीस वर्ष या मतदारसंघांमध्ये घोलप कुटुंबाकडे आमदारकी होती. माजी मंत्री बबनराव घोलप सलग पंचविस वर्षे तर योगेश घोलप हे पाच वर्षे आमदार होते. त्यांच्या राजकीय साम्राज्याला घोलाप यांच्या राजकीय तुलनेत नवख्या सरोज अहिरे यांनी हादरा दिला. घोलप कुटुंबाकडे एकहाती असलेली सत्ता खेचून आणत घोलप कुटुंबाचा सत्तेपासून वंचित ठेवले.
यानंतर महाराष्ट्रात घडलेल्या फोडाफोडीच्या राजकीय घडामोडीमध्ये आमदार सरोज अहिरे यांनी अजित दादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
इतर महत्वाच्या बातम्या आणी वेबसाईटवर पोहचण्यासाठी http://nashikbatmidarnews.com वर क्लिक करा
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळाले. नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा आहे. त्यापैकी देवळाली आणि नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे देवळाली विधानसभा मतदारसंघात शरद पवार ज्या व्यक्तीस उमेदवारीचा टिळा म्हणजे पक्षाची उमेदवारी देतील, तिच व्यक्ती देवळालीचा आमदार होईल, असा वाक्यप्रचार राजकीय पटलावर चर्चिला जातो आहे.
इतर महत्वाच्या बातम्या आणी वेबसाईटवर पोहचण्यासाठी http://nashikbatmidarnews.com वर क्लिक करा