572 Post Views
नाशिक, प्रतिनिधी :
सध्या पृथ्वीवरील तापमान दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे विकासाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड आहे. भविष्यात पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी तसेच तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी वृक्षरोपण आणि वृक्ष संवर्धन अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी खंडेराव मेढे यांनी केले आहे.
देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजूकाया महाविद्यालयात शुक्रवारी ( दि. १४ ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आले होते. त्याप्रसंगी खंडेराव मेढे बोलत होते.