नाशिकरोड, प्रतिनिधी :
नाशिक लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांचा दणदणीत विजय झाला. या पार्श्भूमीवर मुंबई येथे गुरुवारी ( दि.१३ ) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवा पदाधिकाऱ्यांची बैठक वरून सरदेसाई यांच्या उपस्थितीत पार पडली. दरम्यान आगामी विधानसभा निवडणूकीत देवळाली विधानसभा मतदारसंघात भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. अशी माहिती युवती शिवसेनेच्या योगिता गायकवाड यांनी दिली.
नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ वाजे यांचा विजय झाला. त्यांना लोकसभेतील सहापैकी चार विधानसभा मतदार संघात आघाडी मिळाली.त्यापैकी देवळाली विधानसभा मतदारसंघात अनपेक्षितपणे भरगोच मतदान मिळाले. जवळपास ४० हजाराच्या आसपास वाजे यांनी आघाडी मिळाली. मुंबई येथे वरून सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत नाशिक शहर आणि जिल्ह्यातून युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सरदेसाई यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. विधानसभेतील प्रत्येक बूथ आणि त्यात पक्षाला मिळालेली मते, याविषयी सखोल चर्चा झाली. आपल्याला मिळालेली आघाडी अन् पिछाडी अश्या दोनही बाजू विषयी सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी उबाठा युवती शिवसेनेच्या नाशिक विस्तारक योगिता गायकवाड तसेच मधु पाटील, मानसा महाले ,कुसुम पांडया ,मनाली मंडलिक ,सायली खेरनार आदी. महिला सदस्यांची हजेरी होती.
संसरी अन् भगुरच्या मतदानाची चर्चा
विशेष म्हणजे बैठकीत माजी आमदार हेमंत गोडसे यांच्या संसरी गावात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला किती मतदान झाले, तसेच माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या भगूर नगरपालिकेच्या हद्दीत आपल्याला किती मतदान मिळाले. याविषयी सविस्तर चर्चा झाली. एकंदरीत देवळाली विधानसभा मतदार संघ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला अतिशय अनुकूल असल्याचा निष्कर्ष निघाला. त्यामुळे देवळाली विधानसभा मतदार संघात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे भगवा फडकवू , असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
देवळालीत भगवा निश्चित : योगिता गायकवाड
देवळाली विधानसभा मतदारसंघांमध्ये येत्या निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे भगवान झेंडा फडकवीणार आहोत, यासाठी आम्ही तयारीला लागलो आहोत, वेळेप्रसंगी दिवसरात्र एक करू, पण देवळालीत भगवा फडकवून दाखवू, अशी प्रतिक्रिया योगिता गायकवाड यांनी दिली.