इगतपुरी :विक्रम पासलकर
तालुक्यात मागील वर्षी सर्वत्र ऐन खरीप हंगामाच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने धूमाकुळ घातला होता. यावेळी भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी हवालदील झाला होता. परंतु शासन निर्णायानुसार पीक विमा भरलेला असुनही अद्याप बहुतांश शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहिले, असा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे.विमा कंपनीचे अधिकारी प्रत्यक्षात बांधावर जावुन खात्री करूनही गेले.पण अद्याप एक रुपया देखिल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे येथील काँग्रेस पदाधिकारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शासनाने पहिला नुक्सानभरपाई टप्पा खाली पाठविला असला तरी ग्रामीण भागातील डोंगर द-या खो-यातील अडाणी शेतक-यांचे केवायसी अपडेट नसल्याने त्यांच्या खात्यात नुकसान भरपाई वर्ग होत नसल्याची बाब कॉंग्रेसने उघड़ केली आहे.याबाबत कॉग्रेसचे प्रदेश सचिव भास्करराव गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे नायब तहसीलदार गेंडाळे यांना आज निवेदन देण्यात आले. इतर तालुक्यात शेतकरी वर्गास रक्कम वितरीत झाली असुन इगतपुरीवर हा अन्याय का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. म्हणून लवकरात केवायसी प्रक्रिया पूर्ण करुण तत्काळ पिक विमा रक्कम मिळवुन न दिल्यास तहसील कचेरी समोर आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.