इगतपुरी : विक्रम पासलकर
नाशिक जिल्हा गटसचिव व कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा इगतपुरी तालुक्याचे भूमिपुत्र देवीदास नाठे यांची जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली निवडी प्रसंगी राज्य गट सचिव संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विश्वनाथ निकम नाशिक जिल्हा केडर कार्यालयात नाशिक जिल्हयातील नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सभेत एक मताने गटसचिव व कर्मचारी संघटना नाशिक जिल्हा अध्यक्षपदी देविदास नाठे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली.
इगतपुरी तालुक्याला देविदास नाठे यांच्या रूपानेच दुसऱ्यांदा सचिव संघटनेचे जिल्हाध्यक्षपद मिळाले. जिल्ह्यातील सर्व सचिववांकडुन शुभेच्छा देण्यात आल्या. निवड झाल्यानंतर सचिव संघटनेचे राज्याचे अध्यक्ष विश्वनाथ निकम, मालेगाव व मालेगाव तालुका प्रतिनिधी भिला निकम, सिन्नर तालुक्याचे किरण गोसावी, येवला तालुक्याचे नारायण गोरे, बाळासाहेब खोकले, नाशिक तालुक्याचे चंद्रकांत आवटे व सुनील माळी, केदार, विलास पेखळे, देवळा तालुका दीपक पवार, दिंडोरी तालुका नंदू पवार व गवळी, नांदगाव तालुका बाळासाहेब पवार, घुगे आदींसह सचिव संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाठे यांच्या निवडीचे नाशिक मविप्र संचालक अँड.संदिप गुळवे, घोटी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाने, संचालक अर्जुन भोर,भाउसाहेब कडभाने,विश्राम पोरजे ,काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव, शिवसेनेचे तालुकप्रमुख राजेंद्र नाठे,बेलगांव कु-हे सोसायटी चेअरमन मधुकर धोंगड़े,व्हा चेअरमन मुरलीधर धोंगड़े,संचालक सुरेश (सावकार) धोंगड़े, जानोरी सोसायटीचे सुदाम भोर, बाजार समितीचे माजी अध्यक्ष गणपत राव, मुकणे चे माजी सरपंच विष्णू पाटील राव, तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विक्रम पासलकर, प्रभाकर आवारी, घोटी खुर्द पोलीस पाटील कैलास फ़ोकने, कु-हेगाव पो पाटील ज्ञानेश्र्वर धोंगडे, माजी सरपंच संपत धोंगडे,संतोष गुळवे यांच्यासह तालुक्यातुन सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
विश्वास सार्थ ठरविणार
माझ्यावर सर्व सचिवांनी विश्वास टाकुन सलग दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली ती आपण कामांच्या माध्यमातून सार्थ ठरवु तसेच सचिवांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहु.
देविदास नाठे
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष
गटसचिव संघटना, नाशिक