इगतपुरी : विक्रम पासलकर
येत्या 26 जून रोजी होणा-या राज्यातील विधानपरिषदेच्या रिक्त जागांच्या निवडणुकीसाठी नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातुन ऍड संदीप गोपाळराव गुळवे हेच आपले उमेदवार असतील. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारी ला मान्यता दिली आहे. त्यामुळेच त्यांचा आज पक्ष प्रवेश आम्ही करवून घेत असून त्यांच्या रूपाने शिवसेनेला आणि महाविकास आघाड़ीला तरुण उमेदवार मिळाला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्ष संघटन अजुन मजबूत झालेले दिसेल आणि राज्यातील शिक्षकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गुळवे हेच योग्य असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते खा संजय राऊत यानी मुंबई येथे केले.
नाशिक जिल्ह्यातील कॉंग्रेसचे प्रबळ नेते आणि मविप्र संचालक ऍड संदीप गुळवे यानी आज शिवसेना भवन येथे संजय राऊत यांचे सह सेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई,विनायक राऊत, अनंत गीते,अरविंद सावंत,जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत (उभाठा) प्रवेशा केला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी यांना सीट निवडून आणण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन केले. राज्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवणूक एक शिक्षण सेवक असलेला अनुभवी मानुसच करू शकतो आणि त्यात संदीप गुळवे हे पुरेपुर खरे उतरतील व विधानपरिषदेत बसून शिक्षका ना न्याय देतील असेही ते म्हणाले. गुळवे यांचे समवेत टीडीएफ संघटनेच्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ही यावेळी शिवसेनेत प्रवेशा केला आहे.टीडीएफ,एनडीएसटी व इतर अनेक संघटनानी यपूर्वीच गुळवे यांना पाठिंबा दिला आहे. टीडीएफ ने परस्पर उमेदवार घोषित केल्यामुळे हजारों शिक्षकांनी विरोध दर्शविला होता. तसेच नाशिक शिक्षक मतदारसंघातुन अनेक रथी महारथी उतरनार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या पक्ष प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील समीकरण बदलली असून शिवसेनेने महाविकास आघाडिकडुन संदीप गुळवे यांची उमेदवारी घोषित केल्याने अनेकांनी मोठा धसका घेतला आहे.