24.2 C
Nashik
Wednesday, July 2, 2025
spot_img

नाशिककरांना हवा अवैध धंद्याच्या हप्त्यांची यादी जाहीर करणाऱ्या आमदार रविंद्र धनगेकर यांच्या सारखा लोकप्रतिनिधी 

351 Post Views

आमदार रविंद्र धनगेकर यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या समोर पुणे शहरातील अवैध पब, बार आणि वेगवेगळ्या अवैद्य धंद्याच्या हप्त्याची यादी पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या हातात दिली. त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली. त्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पोलिस अन अवैध धंदे करणाऱ्यांच्या मनात धडकी भरली. त्याचप्रमाणे नाशिक शहर अन जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांची स्थिती झाली आहे. पण येथे पोलिसांना अवैद्य धंद्याची यादी देणारा धनगेकर यांच्या सारखा हिंमतवाला लोकप्रतिनिधी नाही ?, त्यामुळेच आज शहरात अवैध धंद्याचा सुळसुळाट झालेला दिसतो. त्यामुळे नाशिकला आमदार रवींद्र धनगर यांच्याप्रमाणे आक्रमक लोकप्रतिनिधी हवा, अशी चर्चा होतांना दिसते.

पुणे शहरात दि ( १९ मे ) रोजी भरधाव वेगाने धावणाऱ्या एका चारचाकी वाहनाने दुचाकीवरील युवक आणि युवतीला उडवले. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. अपघाताची घटना दडपण्याचे प्रयत्न सर्व स्थरातुन झाले. याउलट आमदार रविंद्र धनगेकर यांनी ते प्रयत्न हाणून पाडले, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अन देशात अपघात चर्चेचा विषय ठरला. आणि सर्वत्र महाराष्ट्रातील पोलीस दल, बाल न्यायालय, पुणे येथील ससून रुग्णालयातील डॉक्टर, राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी यांचे गैरबकृत्य उजेडात आणले गेले. त्याचे सर्व श्रेय आमदार रवींद्र धनगर यांना जाते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात धनगेकर यांच्या सोबत सुषमा अंधारे मदतीला धावून आल्या. प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासोबत उत्पादन शुल्क कार्यालयात जात धनगेकर आणि अंधारे यांनी पुणे शहरातील अवैध धंदे आणि त्यांच्याकडून पोलीस अधिकाऱ्यांना दिले जाणारे हप्ते यांच्या नावाची यादी हप्त्याच्या रक्कमेसह अधिकारी वर्गाला दिली. आमदार रवींद्र धनगर यांनी घेतलेल्या निर्भीड भूमिकेमुळे आजच्या घडीला पुणे येथील अपघाताची घटना संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरली. यामुळे जनता जागरूक झाली.त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा पवार यांना गांभीर्याने दखल घ्यावी लागली आहे. केवळ इका प्रतिनिधीने प्रमाणिक भुमिका घेतली तर तो संपूर्ण यंत्रणा कामाला लावू शकतो, जनतेत जागरूकता निर्माण करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याच्या कसबा पेठ विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धनगर ठरले आहे.

नाशिकच्या अवैद्य धंद्याप्रकरणी मौन ?

नाशिक शहराला आमदार रवींद्र धनगर यांच्या सारखा लोकप्रतिनिधी हवा आहे. तशी चर्चा पुणे येथील घटनेमुळे होऊ लागली आहे. नाशिक शहरात मटका,जुगार,अवैद्य दारू विक्री, इतर अवैध धंदे सर्रासपणे दिवसा ढवळ्या आणि रात्री उशिरा पर्यंत सुरू आहे. दिवस रात्र सुरू असणारे दारूचे अनधिकृत धाबे , त्यामुळे निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने घडत असतो. संबधित पोलीस यंत्रणा, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय त्याकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष करते की काय असा प्रश्न निर्माण होत असतो. त्याचप्रमाणे शासकीय यंत्रणेप्रमाणे जनतेच्या प्रश्नासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधींनी देखील याकडे कानाडोळा करतांना दिसतात. त्यांनी मौन बाळगल्यामुळे सर्व अवैद्य धंदे राजरोजपणे नाशिक शहरात सुरू असल्याची चर्चा शहरात कायम केली जात असते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles