माय माऊली भजनी मंडळ तथा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कोणार्क नगर आडगाव शिवार नाशिक या संस्थेच्या माध्यमातून श्रीराम नगर येथील नियोजित शिवमंदिर बांधकामासाठी सामाजिक कार्यकर्ते अतुल मते यांनी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाची देणगी ( 5,555 ) दिली. त्यांनी केलेल्या मदतीबद्दल महिला भजनी मंडळाने मते यांचे आभार व्यक्त करून सत्कार केला.
येथील महिलांनी युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल दादा मते यांना आम्हाला शिवमंदिर बांधून द्या असा आग्रह धरला त्या प्रसंगी त्यांनी सर्वोतोपरी मदत करण्यासाठी मी प्रयज्ञशिल राहिल त्या साठी आपला पण सहभाग हवा त्या प्रसंगी सर्वच महिलांनी आपापल्या परीने पावत्या फाडल्या त्या मध्ये सौ बेबी ताई माणिकराव देशमुख यांना 5555 रूपयांची पावती देतांना युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल दादा मते सोबत माणिकराव देशमुख, प्रभाकर सोनवणे सर, रवींद्र महाजन, सौ सिंधुताई कुशारे, सौ निर्मलाताई गोसावी, सौ मंदाताई पवार, सौ आशाताई भवर सौ लताताई खैरनार,सौ लभडे ताई सौ ठाकरे ताई व इतर बर्याच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .उपस्थित सर्वच महिलांनी लवकरात लवकर मंदिर कसे उभे रहिल या साठी संकल्प केला.