येथील महापालिकेच्या हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील विद्युत पुरवठा सोमवारी ( दि. २७ ) रोजी सकाळी ८ ते रात्री दहा वाजेपर्यंत खंडित झालेला होता. त्यामुळे येथील रुग्णाची मोठया प्रमाणात हाल झाली. ऐन उष्णतेच्या लाटेत विद्युत पुरवठा बंद पडल्याने महापालिका प्रशासनाचा बेजबाबदार पण उजेडात आला आहे. याप्रश्नी तातडीने चौकशी करावी, तसेच सोमवारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी दक्षता घेऊन ठोस उपाययोजना करावी, अश्या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांना दिले. निवेदनातील आशय असा, २७ मे २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासुन रात्री १० वाजे पर्यंत हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय, म.न.पा., नाशिकरोड येथील विजपुरवठा बंद होता त्यामुळे रुग्णांचे तसेच नवजोत बालकांचे व त्यांच्या मातांचे तसेच रुग्णांचे नातेवाईक व नागरीक यांचे आपल्या बेजबाबदार पणा मुळे व निष्काळजीपणा मुळे अतोनात हाल झाले. तापमान ४२ अंशा पेक्षा जास्त आहे. अशा ह्या उष्णते मध्ये संपूर्ण दिवस विज पुरवठा बंद होता. सदर ठिकाणी आपण तात्काळ उपाय योजना करणे गरजेचे होते.
परंतू आपण कुठल्याही प्रकारची जबाबदारी ने काम न करता बारा तास लाईट बंद ठेवली व रुग्णांचे हाल केले. याला सर्वस्वी जबाबदार आपण व आपली यंत्रणा आहे.तरी सदरच्या विद्युत विज पुरवठाचे काम त्वरीत करण्यात यावे व या पुढे विज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.याप्रसंगी प्रशांत दिवे,योगेश देशमुख, रोशन आढाव,योगेश नागरे, जगदीश पवार,स्वप्निल आवटे, निलेश शिरसाठ, किरण डहाळे, सागर निकाळे,आश्विन पवार,अनिल गायखे, दीपक काळे, शेखर पवार, मसूद जीलानी आदी उपस्थित होते.