भगूर : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस एड. नितीन ठाकरे यांनी मंगळवारी ( दि.२८ ) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मस्थळी जाऊन जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते. ऍड. नितीन ठाकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे भगूरचे भूमिपुत्र होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. ब्रिटिश राजवटीत कठोर असणारी काळ्यापाण्याची शिक्षा देखील सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेली आहे. वीर सावरकर यांचे कार्य आजही भारतीयांना प्रेरणा देणारे असल्याचे सरचिटणीस एड. नितीन ठाकरे यांनी म्हटले.
यावेळी दूरदर्शनच्या दूरदर्शन वृत्तवाहिनीच्या निवेदिका मंजिरी मराठे, मनोज कुवर,भूषण कापसे आदी होते. सूत्रसंचालन एसव्हीकेटी कॉलेजच्या शालेय समितीचे सदस्य गजीराम मुठाळ यांनी केले. आभार एसव्हीकेटी कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष तथा सभासद वैभव पाळदे यांनी मानले.