खासदार हेमंत गोडसे नाशिक लोकसभा मतदार संघामधून तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहे.महायुतीचे उमेदवार असलेले खासदार गोडसे तिसऱ्यांदा निश्चितपणे विजयी होतील आणि हॅट्रिक साधतील, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांनी दिली.
नाशिक लोकसभा मतदार संघांमध्ये खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये विकास कामे केली आहे. तसेच केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी मतदारसंघात केली आहे.मतदार संघातील रस्त्यांवर विशेष भर देत डांबरीकरण केले. त्याचप्रमाणे नागरिकांना भेडसावत असणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिळून मिसळून राहणारा खासदार अशी गोडसे यांची प्रतिमा आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये आजवर जे कोणी खासदार झालेत, त्यापैकी हेमंत गोडसे हे सतत संपर्कात असणारे खासदार असा त्यांचा नावलौकिक आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील सिन्नर,इगतपुरी, देवळाली, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य असे अशा विधानसभा मतदारसंघात त्यांनी विकास कामे केली आहेत. विकास कामे आणि केंद्र आणि राज्य शासनाच्या राबविलेल्या विविध योजना त्यांना तिसऱ्यांदा निवडणूकित विजयी करण्यास मोलाचा हातभार लावतील, असा आत्मविश्वास नाशिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांनी व्यक्त केला आहे.