देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई येथे शुक्रवारी ( दि. १७ ) सायंकाळी झालेल्या जाहीर सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रमुख पाच मागण्या मांडलेल्या आहे. उपस्थितांनी मागण्यांचे टाळ्यांच्या कडकडाट स्वागत केले. दरम्यान मोदींनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे स्वागत करून पुढील पाच वर्षाच्या कामकाजासाठी पंतप्रधान मोदी यांना आपला जाहीर पाठिंबा जाहीर केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरचे कलम ३७० रद्द केले,पाचशे वर्षापासून मागणी होत असलेले राम मंदिर उभारले, मुस्लिम महिलांना अडचणीचा ठरणारा अन्यायकारक तिहेरी तलाक कायदा रद्द करून दाखविला. असे धाडसी निर्णय घेतल्यामुळे मोदी यांचे कौतूक करीत काही मागण्या देखील मांडलेल्या आहेत.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, देशावरील परकीय आक्रमक परतून लावून सुमारे सव्वाशे वर्ष हिंदुस्थानात मराठा साम्राज्य उभारणाऱ्या मराठा समाजाचा गौरवास्पद इतिहास शालेय अभ्यासक्रमात मांडण्यात यावा, जेणेकरून पुढच्या पिढीला मराठा समाजाच्या पराक्रमाचा इतिहास,पराक्रम समजु शकतो, घटना बदलणार असा विरोधक आरोप करीत आहे, याविषयी शास्वती द्यावी, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा समुद्रात जेव्हा होईल तेंव्हा होईल , पण त्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी , पराक्रमी इतिहासाची साक्ष असलेल्या गड ,किल्ल्यांचे सुसोभीकरण करून पूर्वीसारखे गतवैभव प्राप्त करून द्यावे, यासाठी एक आंतरराष्ट्रीय दर्जाची समिती स्थापन करावी, मुंबई ते गोवा रखडलेला महामार्ग पूर्ण करावा आदी मागण्यांचा यात समावेश आहे.