येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील पगारे समृद्धी बाळू हि विद्यार्थिनी ९०.८३ टक्के गुण मिळवून देवळाली-भगूर परिसरात पहिली आली आहे.
श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयातील इयत्ता बारावीचा ७६ टक्के निकाल लागला आहे. कला शाखेत जाधव दर्शना (८७.५० टक्के) प्रथम, पाटोळे सानिका -द्वितीय (८५.१७ टक्के ) चौधरी आकांक्षा -तृतीय क्रमांक मिळवला. वाणिज्य शाखेत पगारे समृद्धी -प्रथम (९०.८३), मालुंजकर कीर्ती -द्वितीय (८८ टक्के), पवार जयश्री -तृतीय (८५.६७टक्के) आली आहे. विज्ञान शाखेत करंजकर ओंकार-प्रथम (८२. १७ टक्के), गोडसे श्रावणी-द्वितीय (७६.३३ टक्के), राहणे अपूर्वा-तृतीय (७६.१७) मिळवून तृतीय आली आहे.एससीव्हीसी अभ्यासक्रमात खान अरबाज- प्रथम (६६.६७टक्के ), कमला प्रसाद-द्वितीय ( ६५.६७टक्के ) तर खान अरिफ -तृतीय (५८. ८३ टक्के ) गुण मिळवून तृतीय आला आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड, प्राचार्य डॉ. संपतराव काळे, सेवक संचालक डॉ. एस. के. शिंदे, प्रा. सुनीता आडके, वैभव पाळदे,प्रशांत धिवंदे आदींसह प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे.