येथील सर्वज्ञ सेवा ट्रस्ट, सर्वज्ञ सोशल फाउंडेशन तर्फे दत्त जयंती निमित्ताने जेलरोड येथे दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी केले आहे.
यावेळी माहिती देताना संगमनेरे म्हणाले की, बुधवारी ( दि.३ ) सायंकाळी चार वाजता प्रभाग १८ मधील वसंत विहार येथील दत्त मंदिरापासून भव्य रथ यात्रा मिरवणुकीला सुरुवात होईल. गुरवारी ( दि.३ ) सकाळी नऊ वाजता ५१ लिटर दुग्धाभिषेक सोहळा पार पडणार आहे.त्याचप्रमाणे महाप्रसाद वाटप होईल.भाविकांनी दत्त जयंती उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी केले आहे.
भाविकांमध्ये उत्सहाचे वातावरण
दरम्यान वसंत विहार येथील दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. मंदिराला सजावट करण्यात आली असून परिसरात ठीक ठिकाणी उस्तवाचे फलक, कमानी उभारून वातावरण निर्मिती केली जात आहे. यामुळे येथील दत्त भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे.