महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा नाशिक लोकसभा मतदारसंघात निश्चितपणे विजयी होईल. राजाभाऊ वाजे यांना मिळणारा मतदारांचा प्रतिसाद वाढतो आहे. मतदार स्वयंस्फूर्तीने वाजे यांच्या प्रचारात सहभागी होत आहे.नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात राजाभाऊ वाजे यांना आघाडी मिळेल,असा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा नेते योगेश गाडेकर यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी नाशिक येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा उत्साहात पार पडली.सभेला प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. सभेला झालेली गर्दी राजाभाऊ वाजे यांच्या विजयाचे संकेत आहे.सभेमध्ये सर्व उपस्थितांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद घेतल्याचे दिसून येत होते. सभेला येण्याचे केवळ आवाहन करण्यात आले होते. नागरिक स्वतःच्या वाहनाने सभेला हजर झाले.इगतपुरी, त्रंबक सिन्नर तालुक्यातील नागरिकांसह नाशिक शहरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांमध्ये दिसणारा जल्लोष सभेचे खास वैशिष्ट्य होते. त्याचप्रमाणे प्रचारादरम्यान देखील नागरिक स्वतःहून मोठ्या संख्येने हजेरी लावत आहे. राजाभाऊ वाजे यांना आमचा पाठिंबा असून आम्ही शंभर टक्के राजाभाऊ वाजे यांना निवडून आणू ,अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया प्रचारादरम्यान नागरिकांकडून प्राप्त होतांना दिसतात. एकूणच महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघात अनुकूल वातावरण असून त्याचे रूपांतर विजयात होईल, असा पुनरुच्चार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा नेते योगेश गाडेकर यांनी व्यक्त केला.