प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकला राजकीय दृष्ट्या परिपक्व आणि दमदार नेतृत्वाची गरज आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील जनता महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना निवडून देऊन एक दमदार राजकीय नेतृत्व नाशिक मधून निवडून देतील, असा विश्वास उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे युवा नेते सागर भोजने यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये अनेक समस्या प्रलंबित आहे.स्थानिक नागरिकांना विविध अडचणी भेडसावत आहे. त्यांनी आपल्या व्यथा वारंवार संबंधितांकडे मांडलेल्या आहेत. मात्र त्याच्यावर आतापर्यंत उपाययोजना झालेली दिसत नाही. त्यामुळे नाशिकचे नागरिक त्रस्त आहे. त्यांना दिलासा देणारे, त्यांना न्याय देणारे नेतृत्व हवे आहे. त्यासाठी नाशिककर यावेळेला विद्यमान नेतृत्वात बदल करून राजाभाऊ वाजे यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहतील.
आणि त्यांना हवे असलेले राजाभाऊ वाजे यांच्या सारखे नेतृत्व निवडून आणतील, असे वातावरण दिसून येत आहे. नाशिकचा आवाज दिल्लीमध्ये ठोसपणे उमटायला, घुमायला हवा, नाशिकच्या शेतकरी, कामगार अन गोरगरिबांचे प्रश्न दिल्लीमध्ये उपस्थित करून ते मंजूर करून आणण्याची धमक केवळ राजाभाऊ वाजे यांच्यामध्ये असल्यामुळे राजाभाऊ वाजे यांचा विजय जवळपास नक्की झालेला आहे. असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा नेते सागर भोजने यांनी सांगितले.