महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना जेलरोड परिसरातून मोठे मताधिक्य मिळून त्यांना निश्चितपणे प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा अधिक मतांची आघाडी मिळेल, अशी माहिती माजी नगरसेवक अशोक सातभाई यांनी दिली.
जेलरोड परिसरात मागील काही दिवसांपासून महायुतीची तर्फे ठिकठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे येथील प्रत्येक प्रभागात जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधून हेमंत गोडसे यांचा प्रचार करण्यात येत आहे. छोटे – मोठे व्यावसायिक, दुकानदार, कामगार यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना विजयी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावे,असे आवाहन केले जात आहे. हेमंत गोडसे यांचा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय आहे, असे मतदारांना सांगितले जात असल्याचे माजी नगरसेवक अशोक सातभाई यांनी सांगितले.
सातभाई पुढे म्हणाले की जेलरोड परिसरातील सुरू असलेल्या प्रचारादरम्यान मतदारांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो आहे,त्या प्रतिसादाच्या जोरावर हेमंत गोडसे विजय होतील. मागील दोन वेळेला गोडसे खासदार झालेले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकास कामे केली असून ही गोडसे यांच्या जमेची बाजू असणार आहे.त्यामुळे मतदार पुन्हा तिसऱ्यांदा गोडसे यांना निवडून देतील,असा विश्वास वाटतो आहे.