येथील जय हरी मल्टी स्पेशलिस्ट हाॅस्पीटल येथे महात्मा ज्योतिबा फुले व मुख्यमंत्री सहाय्यता योजना सुरू करण्यात आली आहे. इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका असून या तालुक्यात आदिवासी बांधवाना आरोग्याच्या चांगल्या व मोफत सुविधा मिळावा या हेतूने डॉ.मकरंद काळे व डॉ.रितेश विश्वकर्मा यांनी शासनाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले व मुख्यमंत्री सहायता योजना सुरु केली आहे. त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
तालुक्यातील शिवसेनेचे जेष्ठ नेते निवृत्ती जाधव व मनसेचे जिल्हा संघटक भागीरथ मराडे यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ झाला. मान्यवरांचा हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. मकरंद काळे व डॉ. रितेश विश्वकर्मा यांनी सत्कार केला. योजनेच्या उद्घाटनप्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष रामदास आडोळे, उपतालुका अध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, जेष्ठ नेते देवराम मराडे, सरपंच श्याम चव्हाण, राष्ट्रवादी उप तालुका अध्यक्ष नारायण वळकंदे, विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष आत्मराम मते, विठोबा भागडे, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष शिवा काळे, वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष कृष्णा भगत, सामाजिक कार्यकर्ते निखिल गोठी आदी उपस्थित होते.