340 Post Views
नाशिक विभागीय सचिव अमोल खरे यांचे हस्ते पिंगळे यांचेसह नूतन जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांना नियुक्ती पत्र प्रदान
इगतपुरी : विक्रम पासलकर
पत्रकारांच्या न्याय हककासाठी लढा देणारी राज्यातील तमाम पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्नित नाशिक जिल्हा मराठी पत्रकार परिषदेची मंगळवार ( दि ८ ) एप्रिल रोजी नाशिक येथे परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. एस. एम. देशमुख,विश्वस्त किरण नाईक यांच्या सूचनेनुसार व नाशिक विभागाचे विभागीय सचिव अमोल खरे यांच्या प्रमुख उपस्थितीतीत बैठक होऊन पुढील प्रमाणे जिल्हा कार्यकारणी निवडण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रमेश देसले होते. ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांनी आजची पत्रकारिता व त्यांच्या पुढील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करून आगामी काळात संघटनेचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आव्हान केले.

यावेळी जिल्हा कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र विभागीय सचिव अमोल खरे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी सर्वांनी आपापले मनोगत व्यक्त करून सर्व तालुकास्तरीय नूतन कार्यकारिणी लवकरच सर्वांच्या विश्वासाने एकमुखी ठराव करून देण्याचे ठरविण्यात आले.यावेळी मुंबई पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी दूरध्वनी वरून सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हास्तरीय नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढील प्रमाणे
जिल्हाध्यक्षपदी मोतीराम पिंगळे (पत्रकार – देशदूत, तालुका नाशिक) यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्ष श्री. भास्कर कदम (मुक्त पत्रकार, नाशिक शहर), सरचिटणीस श्री. निलेश वाघ (पत्रकार – एनडीटीव्ही मराठी, तालुका नांदगाव), कोषाध्यक्ष श्री. अरुण बिडवे (पत्रकार – सकाळ, तालुका नाशिक), संघटक श्री. रवींद्र पगार (पत्रकार – सकाळ, तालुका कळवण), उपाध्यक्ष श्री. योगेंद्र वाघ (पत्रकार – देशदूत, तालुका येवला), सह-सरचिटणीस श्री. काशिनाथ हांडे (पत्रकार – देशदूत, पुढारी, तालुका बागलाण-सटाणा), सह-संघटक श्री. दीपक निकम (पत्रकार – महाराष्ट्र टाइम्स, तालुका चांदवड), जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा नाशिक शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.संपत देवगिरे (वृत्तसंपादक सकाळ, नाशिक शहर), श्री. विलास पाटील (पत्रकार – देशदूत, तालुका सिन्नर), श्री. उपाली परदेशी (पत्रकार – पत्रीसरकार, मनमाड शहर), श्री. मनोहर शेवाळे (पत्रकार – टीव्ही 9 मराठी, तालुका मालेगाव), श्री. संतोष गिरी (पत्रकार – देशदूत, तालुका निफाड), श्री. नितीन गांगुर्डे (पत्रकार – देशदूत, तालुका दिंडोरी), श्री. रतन चौधरी (पत्रकार – सकाळ, तालुका सुरगाणा), श्री. सुनील बोडके (पत्रकार – लोकमत, तालुका त्र्यंबकेश्वर), श्री. विक्रम पासलकर (पत्रकार – लोकमत, तालुका इगतपुरी), श्री. रामदास शिंदे (पत्रकार – लोकमत, तालुका पेठ), श्री. जहूर खान (पत्रकार – इंडिया टीव्ही, मालेगाव शहर), श्री. दिनकर आहेर (पत्रकार – लोकमत, तालुका देवळा) यांची निवड रमेश देसले (पत्रकार – दिव्यमराठी, सटाणा तालुका) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे. सर्व कार्यकरणीचे जिल्हाभरातून मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे



