645 Post Views
नाशिक रोड : प्रतिनिधी
महावीर किराणाचे संचालक तथा दैनिक सकाळचे एकलहरा बातमीदार पत्रकार निलेश छाजेड यांच्या अपघाती मृत्यु प्रकरणी महापालिका प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा.या मागणीसाठी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना नाशिक मराठी पत्रकार संघ, श्री जैन स्थानकवासी श्रावक संघ व एकलहरा ग्रामस्थ यांचे वतीने निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की,दैनिक सकाळ या वृत्तपत्राचे एकलहरा परिसराचे बातमीदार व महावीर किराणा दुकानांचे संचालक निलेश बन्सीलाल छाजेड यांचा रविवारी ( रात्री ९.०० ) वाजेच्या दरम्यान अपघाती मृत्यु झाला होता. एकलहरारोड, जुना जकात नाका येथे रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम केलेल्या ठिकाणी ही घटना घडली. संबघीत ठेकदारांने खड्डा बुजविण्यासाठी रस्ता सपाटी पासुन एक फुट उंच मातीचा ढीग केलेला होता. या मातीच्या ढिगावर ( उंच टेकुड )रात्रीच्या वेळी दिसत नसल्याने छाजेड यांची दुचाकी घसरुन त्यांचा जागेवर अपघाती मृत्यू झाला. दरम्यान या मातीच्या टेकूडावर एक महिला गाडीवर पडून जखमी झाल्याची घटना उजेडात आलेली आहे. अनेक प्रवासी येथे मातीच्या टेकूडावर घसरुन पडत आहेत. याबाबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.
याप्रसंगी श्री जैन स्थानकवासी श्रावक संघ प्रमोद छाजेड, तुषार छाजेड,कमलेश कांकरिया, प्रितेश ओस्तवाल, नेमिचंद कोचर, जितू कोचर, डॅ. किरण धांडीवाल, गणेश भामरे, राजु लुणावत, प्रदिप भंडारी,अलपेश खिंवसरा, विजय बेथमुथा, सुभाष बोथरा, प्रविण लोढा, शरद कटारिया, उमेश चोपडा, दिलीप बाफणा, निखील छाजेड, ग्रामस्थाच्या वतीने सागर जाधव, अनिल जगताप, राजाराम धनवटे, शंकर धनवटे, सुकदेव वारडे, शांताराम कापसे, डॅ. संदिप भवर,शांताराम कापसे, रामकृष्ण शिंदे,सुरेखा पगारे, संदिप गायकवाड, नाशिक मराठी पत्रकार संघच्या वतीने सकाळचे ज्येष्ठ पत्रकार विनोद बेदरकर, सकाळचे नाशिकरोड प्रतिनिधी अंबादास शिंदे, दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार मनोज मालपाणी, पत्रकार अन्वर पठाण,योगेश मानकर, हरिष बोराडे,संतोष भावसार आदि उपस्थित होते.



