इगतपुरी तालुक्यातील नवनियुक्त न्यायाधिश वाजे,जाधव यांचा तालुका समाज विकास फाउंडेशन तर्फे गौरव
इगतपुरी तालुका: विक्रम पासलकर
अस म्हणतात जिद्द असली की कोणतेही यश मिळाल्याशिवाय राहत नाही. जिद्दीला सलाम ठोकावे असेच यश इगतपुरी तालुक्यातील दोन युवकांनी आपल्या कणखर कष्टाला गवसणी घालून मिळवले आहे. घोटी येथील वाजे कृषी सेवा केंद्राचे संचालक आणि श्रीक्षेत्र खेडभैरव येथील शेतकरी अरूण वाळूजी वाजे यांचे सुपुत्र विवेक आणि घोटी बाजार समितित भाजीपाला विक्रेते म्हणून गेली पंचविस वर्ष व्यवसाय करणारे पांडुरंग जाधव यांचे चिरंजीव अंकुश या वाजे आणि जाधव परिवाराच्या दोन्ही शिलेदारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2020 अंतर्गत दिवाणी न्यायाधीश कंनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग या कक्षेत येणाऱ्या अवघड परीक्षेत उत्तुंग यश मिळवून मोठे यश संपादन केले आहे.
हजारों विद्यार्थ्यांमधुन या दोन सर्वसामान्य युवकांनी दैदीप्यमान यश संपादन केल्यामुळे इगतपुरी तालुका समाजविकास फाउंडेशन च्या पदाधिकारी संचालक मंडळातर्फे त्यांचा घोटी व खेड येथील निवासस्थानी जाउन त्यांच्या परिवाराचा सन्मान चिन्ह, शॉल व पुष्पगुच्छ देवून यथोचित गौरव करण्यात आला.फाउंडेशन चे उपाध्यक्ष उमेश खातळे,भास्कर गुंजाळ यानी यावेळी मनोगत व्यक्त करुण समाजविकास फांउडेशन चे कार्य,मानस व महत्व विशद करुण उपस्थित नागरिकांना संबोधित केले.
यावेळी घोटी बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक सुनील जाधव, दिलीप जाधव, अरुण वाजे,पांडुरंग जाधव, इगतपुरी तालुका समाजविकास फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तुकाराम सहाणे, उपाध्यक्ष उमेश खातळे,सचिव विष्णु वारुंगसे संचालक सर्वश्री संदीप पागेरे, हरिश्चंद्र नाठे, नामदेव शिंदे,विजय कातोरे, मछिन्द्र खातळे,मोहन ब-हे, अड कैलास शिरसाठ, भास्कर गुंजाळ, श्रिजय जाधव, रामदास गव्हाणे, विक्रम पासलकर,योगेश जाधव, भाऊसाहेब कडभाने,संदीप पवार,सागर जाधव आदी सह वाजे,जाधव परिवारातील सदस्य उपस्थित होते.