पत्रकार समाज विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतो आणि तोच सर्व राजकीय लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांना समाजातल्या समस्यांविषयी अवगत करत असतो,म्हणूनच आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींना समाजाभिमुख कामे करण्यास प्रोत्साहन मिळते असे प्रतिपादन आमदार हिरामण खोसकर यांनी कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महविद्यालायात आयोजित पत्रकार दिनानिमित्त केले.
यावेळी व्यासपीठावर तहसीलदार अभिजित बारवकर, प्राचार्य डॉ.रकिबे, घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पंचायत समिती माजी उपसभापती पांडुरंग वारूंगसे, शेतकरी नेते पांडुरंग मामा शिंदे, संजय खातळे,इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम राठोड,जिल्हा प्रतिनिधी शरद मालुंजकर आदी उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक प्राचार्य डॉ. रकीबे यांनी केले,तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम राठोड यांनी पत्रकार संघाचे कार्य विषद केले.यानंतर इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सर्वश्री राम शिंदे, किशोर देहाडे,भागीरथ आतकरी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यावेळी तहसीलदार अभिजित बारवकर, पांडुरंग वारुंगसे, राम शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन व्ही.बी.राठोड यांनी केले तर आभार पत्रकार शरद मालुंजकर यांनी व्यक्त केले.यावेळी माजी अध्यक्ष विक्रम पासलकर,गोपाळ शिंदे,राजेंद्र गायकवाड,विजय पगारे,राहुल सुराणा,विजय बारगजे, ॲड.मंगेश शिंदे,किसन काजळे, गौरव परदेशी,निलेश काळे,लक्ष्मीकांत शिंदे, विशाल रोकडे,युवराज राजपुरे,आदी पत्रकार बांधव आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.