495 Post Views
नाशिकरोड : उमेश देशमुख
लेखणीचे सामर्थ्य समाजात सर्वात महत्त्वपूर्ण आहे. कुठल्याही कार्यक्रमाचे मोजमाप हे त्या बातमीच्या प्रसिद्धीवरून कळत असते. समाजाला योग्य दिशा देण्याचे काम पत्रकार करीत असतात. स्वतःचा जीव धोक्यात घालुन,प्रसंगी जीवावर उदार होऊन पत्रकारिता करीत असतात. या क्षेत्रात पत्रकारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सरकार आणि समाज यांचे माध्यम म्हणजे पत्रकार असून देशातील लोकशाही टिकवत ती मजबूत ठेवण्याचे काम पत्रकार करीत असतात. असे प्रतिपादन प्रमुख अतिथी इंजिनीयर शेखर ढिकले यांनी केले.
जेलरोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालयात सोमवारी ( दि. ६ ) पत्रकार दिनानिमित्ताचे औचित्य साधत कार्य गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इंजि.शेखर ढिकले बोलत होते.अध्यक्षस्थानी डॉ.धर्माधिकारी बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणुन एकलहरे गावचे ग्रामपंचायत सदस्य सागर जाधव, शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन चावला, साहेबराव खर्जूल, दत्तात्रय धात्रक, नाशिकरोड-देवळाली शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर, प्रशांत कळमकर, अभय खालकर, माजी नगरसेवक पंडित आवारे, माजी नगरसेविका संगीता गायकवाड, हेमंत गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार मोतीराम पिंगळे, अध्यक्ष सुनील पवार, नरेंद्र पाटील, माजी अध्यक्ष सुधाकर गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दीप प्रजलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. नाशिक मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पवार यांनी प्रास्ताविक तर रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. अरुण बिडवे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी अरुण तुपे, प्रवीण आडके, दीपक कणसे, वसंत कहांडळ, संजय निकम, प्रकाश उखाडे, संतोष भावसार, नंदकुमार शेळके, प्रशांत धिवंदे, उमेश देशमुख, हरिष बोराडे, भास्कर सोनवणे, नथू ढिकले आदिंसह सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारांनी स्वतःचे आरोग्य जपावे : डॉ. धर्माधिकारी
सर्वांना योग्य दिशा देण्याचे कार्य करणारे पत्रकार समाजाला आपल्या लेखणीने सशक्त करत असतात. सामाजिक स्वास्थ्य जपण्याबरोबरच पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याची दक्षता घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले.
पत्रकांरासाठी अपघाती विमा
एकलहरे ग्रामपंचायतचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी अपघाती विमा पॉलिसी काढून सहकार्य केले. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे यांच्याकडे विमा पॉलिसी सुपूर्द करण्यात आली. सागर जाधव म्हणाले की पत्रकारांचे समाजा त भरीव योगदान आहे. रात्रंदिवस एक करून ते पत्रकारिता करीत असतात. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ नसतो. कुटुंबाकडे आवश्यकता प्रमाणात लक्ष पुरवता येत नाही. सतत समाजात वावरत असतात. पत्रकारांचे आरोग्य महत्त्वाचे असून त्यांनी त्याकडे लक्ष द्यायला हवे.
यांचा झाला पुरस्कार आणि सन्मान
मान्यवरांच्या हस्ते फणींद्र मंडलिक (महाराष्ट्र टाइम्स),नरेंद्र जोशी (देशदूत), दिलीप सोनार (गावकरी), तुषार माघाडे (सकाळ), नरेंद्र दंडगव्हाळ (लोकमत ), विजय गीते (पुण्यनगरी), प्रदीप गायकवाड (दिव्यमराठी ), नाना खैरनार (भ्रमर ), स्वप्निल लेकुरवाळे ( आपलं महानगर), दिलीप सूर्यवंशी (पुढारी), कुंदन राजपूत (लोकनामा), सुधीर पेठकर (नवराष्ट्र), संजय देवधर (न्यूज मसाला ), संदीप नवसे (जागर जनस्थान ), साहिल बेलसरे (9 न्यूज महाराष्ट्र) , प्रशांत जेजुरकर (दिशा न्यूज), तेजस्विनी ताकाटे (एनसीएन न्यूज) यांसह वृत्तपत्र विक्रेते भाग्यश्री माळवे ( नाशिकरोड ), प्रकाश गोडसे (देवळाली कॅम्प ) ज्ञानेश्वर वाघ ( जेलरोड ), मीना वाकचौरे ( गिरणारे ) आदींसह विशेष पुरस्कार्थींमध्ये सरस्वती मित्र मंडळ (देवळाली कॅम्प), वैभव ग्रामीण पतसंस्था (पळसे), आदिशक्ती मित्र मंडळ (माडसांगवी ), विचारक्रांती वाचनालय (जाखोरी), रॉयल रायडर्स (सायकल समूह ), हरिनाम सप्ताह कमिटी (शिंदे ), गजानन महाराज महिला भजनी मंडळ ( भगूर ), स्व.गणेश धात्रक शिक्षण संस्था (जेलरोड), हॉलिफ्लॉवर इंग्लिश मीडियम (नाशिकरोड), शुभम शिंदे (पळसे ), प्रवीण लकारिया (भगूर), भक्ती कोठावळे (नाशिक), संगीता पिंगळे (मातोरी), शिवाजी माळोदे (नांदूर), दिनेश निकम (जेलरोड), कैलास धात्रक (जाखोरी), किरण गायकवाड (नाशिकरोड), पंकज शेलार (विजयनगर) राजेंद्र खर्जुल (नाशिकरोड), वामनराव घोडे (चेहडी) आदींचा कार्यगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.