177 Post Views
दिंडोरी प्रतिनिधी : अशोक निकम
क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय दिंडोरी येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बापू चव्हाण, दिंडोरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास ढाकणे, पत्रकार रामदास कदम, संतोष कथार, अशोक निकम, सुखदेव खुर्दळ, अशोक केंग, संदीप गुंजाळ, बाळासाहेब अस्वले, अमोल जाधव, सुनील जाधव, समाधान पाटील, सुनील घुमरे, श्रीराम देवकर, बंडामहाराज खडांगळे या पत्रकारांचा महाविद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे यांनी पत्रकारांचे समाजातील योगदानाबद्दल मनोगत व्यक्त करुन उपस्थित पत्रकारांना पत्रकार दिनाच्या महाविद्यायातर्फे शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी व विद्यार्थी उपस्थित होते.