मानवी जीवनामध्ये स्वतःला आकार देण्यासाठी ग्रंथांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. प्रत्येकाने जीवनामध्ये वाचन केले पाहिजे. ग्रंथांमध्ये जीवनाच्या अनुभूती असतात.वाचनाने माणसे घडतात.असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. प्रतिमा पंडीत वाघ यांनी केले.
देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात बुधवारी ( दि.१ ) महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन व वाचन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्राचार्या वाघ बोलत होत्या. व्यासपीठावर सुभाष वाचनालय विहितगाव वाचनालयाचे अध्यक्ष कैलास हांडोरे तसेच शिवाजी हांडोरे, संदीप डुंबरे,कवी शिवाजी पगार, महेंद्र पांगारकर, श्रीकांत हांडोरे,पोपटराव पोरजे,अमर जमधडे, दिनेश हांडोरे, लता हांडोरे, समन्वयक उपप्राचार्य डॉ. दिलीप जाधव, श्रीमती सविता आहेर, सतीश कावळे, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजूकाया कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प व सुभाष वाचनालय व ग्रंथालय विहित गाव यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात सामूहिक वाचन आणि वाचन कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
नांदूर मानुर परिसरात शासकीय मान्यता प्राप्त महारुद्र नर्सरी / रोपवाटीका
प्राचार्या डॉ.प्रतिमा वाघ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन झाले. कार्यशाळेत सुप्रसिद्ध मराठी कवी शिवाजी पगार यांनी वाचनाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले वाचनाशिवाय मानवी जीवनाचा विकास नाही. व्यक्तिमत्व विकासाकरता प्रत्येकाने वाचले पाहिजे आजच्या आधुनिक युगात वाचनाकडे कल कमी होताना दिसत आहे .यानंतर पांगारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते आपल्या मार्गदर्शनात म्हणाले वाचनाने माणसाला सत्सत विवेक बुद्धीची जाणीव होते. जीवनाबद्दलचा दृष्टिकोन सापडतो वाचनाने ऐतिहासिक गोष्टीतून प्रेरणा मिळते.त्या प्रेरणेने जीवनाचा रस्ता सोपा होतो. आणि माणसाचा शाश्वत विकास होतो. सामाजिक जीवन सुव्यवस्थित राहते. सामाजिक बांधिलकीची जाणीव होते आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळते.
शिवाजीराव हांडोरे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले.ते म्हणाले वाचन ही मानवी जीवनाला एक देणगी आहे .माणूस वाचत गेला की माणसं वाचायला शिकतो. साहित्यातून समाज जीवनाची सुखदुःख प्रतिबिंबित होतात. ती सुखदुःखे का निर्माण झाली याची कारणमीमांसा वाचनामुळे होते. आणि जगण्याचा आत्मविश्वास ग्रंथातून निर्माण होतो. असे महत्त्वाचे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक उपप्राचार्य डॉ .डी.टी. जाधव यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून वाचनाचे महत्त्व विशद करून वाचनासारखे दुसरी दौलत नाही. ती दौलत निर्माण करण्यासाठी माणसाने आयुष्यभर काही ना काही वाचत असं राहिले पाहिजे . खरी जीवन शिदोरी ग्रंथांमधून आहे .तरुणपणात वाचल्याने माणसाला ध्येय निश्चिती करणे आणि जीवन जगणं सोपं जात म्हणून विद्यार्थ्यांनी वाचनाकडे वळाले पाहिजे .असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता आहेर यांनी केले. तर आभार प्रदर्शन कैलास हांडोरे यांनी केले.