भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध गुरुवारी (दि.१९) नाशिकरोड येथील ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालास पुष्पहार अर्पण करून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली. ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष दिनेश निकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन पार पडले.
याप्रसंगी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांचा धिक्कार असो, बाबासाहेब के सन्मान में, काँग्रेस पक्ष मैदान में., अमित शहा राजीनामा दया, अमित शहा माफी मांगो, भाजप सरकार हाय हाय, अश्या घोषणा दिल्या. दरम्यान अमित शहा यांच्यावर ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी झालेल्या निदर्शन आंदोलनात बबलू खैरे,उद्धव पवार, दिनेश निकाळे,विजय पाटील,कैलास कडलग,कामिल इनामदार,कुलदीप गवई,सचिन गांगुर्डे,एजाज सैय्यद,तोफिक शेख,इम्रान अन्सारी,अरुणा आहेर,लीलावती पवार,उमेश दासवानी,भरत पाटील,उमेश चव्हाण,सुमित सोनवणे,सुनिल निरभवने,राहुल बागुल,तोफिक पठाण,युवराज मनेरे,विजय वाघ,संतोष मुकणे,प्रवीण बोरसे,करण शिंगाडे,सदाशिव बोराडे आदींचा सहभाग होता.