23 C
Nashik
Sunday, July 6, 2025
spot_img

आमदार मिटकरी यांच्या विकास निधीतून जेलरोडच्या प्रभाग अठरामध्ये बाके अन् ग्रीन जीम सुविधा ! ; योगेश निसाळ

490 Post Views

नाशिकरोड : उमेश देशमुख

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यातर्फे जेलरोड मधील प्रभाग अठरा मध्ये पंचवीस लाखांचा विकासनिधी उपलब्ध करुन दिला. राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच जेलरोड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश निसाळ यांनी आमदार मिटकरी यांच्याकडे पाठपुरावा केला.

पत्राद्वारे प्रभाग अठरातील कॉलनी रस्ते,बेंचेस,ग्रीन जीम साहित्यासाठी विशेष निधीची मागणी केली होती. मागणीला आमदार अमोल मिटकरी यांनी तात्काळ प्रतिसाद दिला. सदर विकासनिधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यानुसार शुुक्रवारी ( दि. १३ ) जेलरोड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश निसाळ,सदस्य व नागरिकांच्या उपस्थित प्रभाग अठरा मध्ये विविध ठिकाणी बॅचेस बसविण्यात आले.

प्रशासकीय राजवटीमुळे निधी

नाशिक महापालिकेत अडीच वर्षापासून प्रशासक राजवट आहे. नगरसेवकांचे अधिकार संपुष्टात आले आहेत. त्यामुळे विकासकामांसह इतर कामे रखडल्याचे चित्र आहे. योगेश निसाळ यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडे आमदार निधीतून विकासनिधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. तत्पूर्वी नागरिकांनी योगेश निसाळ यांच्याकडे प्रभागात भेडसवणाऱ्या समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने कॉलनी परिसरातील कॉक्रिटीकरण रस्त्याची आवश्यकता आहे. तसेच अनेक उद्यानांमध्ये बसण्यासाठी बेंचेस नसल्याने गैरसोय होत आहे. ग्रीन जीम आहे, पण ती काही उपयोगाची नाही. त्यामुळे याप्रकरणी निसाळ यांनी काहीतरी करावे. अशी अपेक्षा प्रभाग अठरातील नागरीकानी निसाळ यांच्यासमोर मांडली. निसाळ यांनी नागरिकांच्या समस्या एकल्यानंतर आमदार अमोल मिटकरीकडे रस्ते, बॅचेस, ग्रीन जीमसाठी विकासनिधी उपलब्ध करुन देण्याची आग्रही मागणी केली.

तत्काळ निधी मिळाला

आमदार मिटकरी यांनी विकासनिधी देताना आखडता हात न घेता, तो उपलब्ध करुन दिला. महत्वाचे म्हणजे जेलरोड मधील प्रभाग अठराशी त्यांचा कुठलाही संबंध नसतानाही त्यांनी निसाळ यांनी केलेल्या पाठपुरवठयाची दखल घेत पंचवीस लाखाचा निधी उपलब्ध करुन दिला. या निधीतून हिंदशक्ती नगर, पंचक, महारुद्र हनुमान मंदिर, अयोध्या नगर, राज राजेशर्वरी चौक, श्री राम नगर, चरणदास मार्केट, भारत भूषण सोसायटी व इतर प्रभागात मजबूत लोखंडी बॅचेस, ग्रीन जीम बसवले जात असल्याने प्रभाग अठरातील नागरिकांनी आ. मिटकरी व निसाळ यांचे आभार मानले आहेत.

मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा

यापूर्वी जेलरोड विकास प्रतिष्ठान च्या माध्यमातून प्रभाग अठरात मोफत वैकुठ रथ सेवा उपलब्ध करुन देण्याबरोबरच प्रभागातील नागरिकांना टॅकरद्वारे पाणी पुरवठा करुन तहान भागवली जात आहे. त्याच अनुषंगाने आता पंचवीस लाखांचा विकासनिधी आ. अमोल मिटकरी यांनी उपलब्ध करुन दिल्याने त्यांचे प्रभाग अठराच्या वतीने आभार मानतो. या विकासनिधीतून बेंचेस, ग्रीन जीम, कॉलनी रस्ते काम मार्गी लावले जाणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles