नाशिकरोड : उमेश देशमुख
संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी ( दि. २० ) नाशिकरोडला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आले. अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गट, राष्ट्रीय कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या अमित शहा यांचा धिक्कार असो, अमित शहा राजीनामा दया, अमित शहा माफी मांगो,भाजप सरकार हाय हाय, अश्या घोषणा देत शहा यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे, अशोक सातभाई, दिनेश निकाळे,राजेंद्र ताजणे,किरण डहाळे, शिवा गाडे,सचिन आहेर,प्रशांत दिवे, सुनील बोराडे,राहूल ताजनपुरे,योगेश देशमुख,राजेंद्र पवार,विकास गीते,चंदू महानुभाव, मसुद जिलानी, संजय भालेराव, राजेंद्र मोरे, सत्याबाई गाडे, योगेश गाडेकर, उमेश शिंदे, शेखर पवार, सागर निकाळे, विलास थोरात, रमेश पाळदे,सुरज भान डिगीया, भीमा निकम, गोटू मोहिते, अनिल गायखे, प्रवीण बोराडे, प्रशांत पगारे, गोविंद कागडे, सोनू बागुल,विजय भालेराव, विजय काळदाते, युवराज मुठाळ, संजय पोरजे, साजन डिगीया, लक्ष्मण साळवे, सुनील निर्भवणे, राहूल बागुल, तोफीक शेख, दिपक गायकवाड, अरविंद काकडे आदी उपस्थित होते.